मनमाड – नागरिक हो सावधान, कोरोना अद्याप गेलेला नाही याउलट कोरोना ने मनमाड मध्ये शिरकाव केलेला आहे एवढेच नव्हे तर बघता बघता आज अखेर तीन (३) बळी घेतले आहे, पेशंट ची संख्या वाढत आहे, ही मोठी चिंताजनक बाब आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, घाबरु नका, आपण या आजाराला निश्चितपणे थोपवू शकतो, हाकलून लावू शकतो, सर्वांनी शिस्त आणि नियम पाळण्याची गरज आहे म्हणून, समस्त व्यावसायिक, दुकानदार, विक्रेते यांना कळविण्यात येते की, कोरोना विषाणू संसर्गित रोगाचे पार्श्वभूमीवर या साथ रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये या हेतूने काही अटी आणि शर्ती चे आधारे आपत्ती व्यवस्थापन आणि नियंत्रण कायदा आणि नियमांचे अधिन राहून आपणास व्यवसाय करणेस,सुरू ठेवणे स वेळेचे बंधन घालून देऊन परवानगी देण्यात आलेली आहे. त्या नियमांचे तसेच अटी व शर्ती यांचे पालन करणे आपणास बंधनकारक आहे.त्यामध्ये आपले आणि प्रत्येक नागरिकाचे, शहराचे, राष्ट्राचे हित आहे. गर्दी विभागली जावी, गर्दी होऊ नये, गर्दीवर नियंत्रण यावे यासाठी शहरांतील दुकाने व आस्थापना यांच्या मुख्य दर्शनी भाग आणि तोंड अथवा मुख्य प्रवेशद्वार दिशा नुसार एक दिवसाआड सुरू ठेवणेचे शासनाचे आदेशानुसार आदेश लागू करणेत आले आहेत. तथापि काही ठिकाणी त्याचे उल्लंघन होत असल्याचे आणि वाद घालत असलेचे प्रकार आढलून येत आहे. एवढेच नव्हे तर दंड करूनही फरक पडला नाही म्हणून फौजदारी गुन्हे देखील दाखल केले आहेत. त्याबद्दल भविष्यात संबंधितांना शिक्षा भोगावी लागेल यात शंका नाही पण कोणाचेही जीवास धोका पोहोचविण्याचा कोणालाही अधिकार नाही, याचे संबंधितांनी भान ठेवावे.कारण आजमितीस ही बाब सार्वजनिक दृष्ट्या अत्यंत गंभीर स्वरूपाची आणि घातक स्वरूपाची आहे, कायदा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, पथक नेमून लक्ष दिले जात आहे.त्याचाच भाग म्हणून सदरचे पथक शहरात ज्या अस्थापनाच्या ठिकाणी अटी व शर्ती पाळल्या जात नाही अशा ठिकाणी भेट देऊन जागेवरच कारवाई करणार आहे अन करीत आहे, मात्र त्यानंतरही अटी आणि शर्ती यांचे पालन न केल्यास,प्रशासनाच्या सूचना गांभीर्याने न घेतल्यास, कायदा हातात घेतल्यास उल्लंघन कोणताही विचार न करता जनतेच्या आरोग्याच्या व्यापक हिताचे दृष्टीकोनातून प्रतिबंधक उपाययोजना म्हणून दुकान सीलबंद करणेत येईल.याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.डॉ. दिलीप मेनक र , मुख्याधिकारी,नगरपरिषद मनमाड,काही महत्वाच्या टिप्स -(सन 2020 हे वर्ष जिवंत राहण्यासाठी काळजी घेणेच वर्ष आहे याची सर्वांना जाणीव करून देणे येत आहे, जगा आणि जगू द्या.पुण्य कर्म करणे ची हीच खरी वेळ आहे, उत्पन्न,मालमत्ता, संपत्ती,प्रगती याबाबत नंतर बघता येईल. घरात थांबा, मास्कचा वापर करा,सामाजिक अंतर ठेवा,वारंवार हात धुवा,स्वच्छता ठेवा,गर्दीत जाणे टाळा,सुरक्षित राहा,लहान मुले आणि वडीलधारे यांची काळजी घ्या. बाहेर गावाहून आले असल्यास स्वतःची आणि परिवाराची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी,होम quarrantine स्वतःहून व्हावे,वैद्यकीय तपासणी नंतर होम quarrantine केले असल्यास कोणत्याही परिस्थितीत बाहेर फिरू नये,त्यामुळे आपणास आणि इतरांना धोका पोहोचणार नाही असे आव्हान करण्यात येत आहे.