अहमदनगर (सुनिल नजन “चिफ ब्युरो”अहिल्यानगरजिल्हा ) अहमदनगर जिल्ह्यातील 222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शिरसाठ वाडी येथील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी गेलेल्या भाजप आणि महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कासार पिंपळगाव सह संपूर्ण पाथर्डी तालुका बंद ठेवण्यात राजळे समर्थक यशस्वी झाले आहेत.आमदार राजळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील कासार पिंपळगाव आणि सर्व ग्रामस्थांनी गावात निषेध सभा घेऊन गावातून मुक मोर्चा काढून आपला निषेध नोंदवून संताप व्यक्त केला.भाजपचे पागोरी पिंपळगाव येथील कार्यकर्ते उद्धव घनवट,आणि महादेव घनवट यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. शिरसाठ वाडी येथील नारायण म्हस्के या भाजप कार्यकर्त्यांवर ही प्राणघातक हल्ला करण्यात आला.भारजवाडी येथील मतदान केंद्रावर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे आणि आमदार मोनिकाताई राजळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. आमदार मोनिकाताई राजळे यांनी कासार पिंपळगावात,प्रतापराव ढाकणे यांनी अकोले येथे,चंद्रशेखर घुले यांनी दहिगाव येथे,हर्षदाताई काकडे यांनी वरूर येथे,मतदानाचा हक्क बजावला.शिरसाठवाडी येथील मतदान केंद्र ताब्यात घेण्यात आले होते. तेथे शेवटी निम्मे निम्मे मतदान करू असा पवित्रा घेऊन मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असतानाच आमदार मोनिकाताई राजळे तेथे गेल्यावर त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. आमदार मोनिकाताई राजळे यांना तेथेच एका खोलीत सुरक्षित ठेवण्यात आले होते. नंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना पाथर्डीतील व्हाईट हाऊस येथे आणण्यात आले.आमदार मोनिकाताई राजळे यांच्या खांद्याला दगडाचा गंभीर मार लागला असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी कोणताही अनुचित प्रकार न करता रागावर संयम ठेवून शांतता राखण्याचे आवाहन आमदार राजळे यांनी केले आहे.सरकारने आ.राजळे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी सामान्य जनतेची मागणी आहे. एकंदरीत हा सर्व गंभीर प्रकार घडूनही आमदार मोनिकाताई राजळे यांनी दगडफेक करणार्या युवकांचे करिअर खराब होउ नये म्हणून त्या युवकावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल न करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मतदान केंद्र ताब्यात घेण्याच्या प्रकारामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Home Breaking News आ.राजळे वर बुथ केंद्रावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कासार पिंपळगाव सह पाथर्डी...








