अहमदनगर : (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) राघोहिवरे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे जगदगुरू संत गव्हाणे बाबा यांच्या ३१व्या नारळी सप्ताहाची ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली कराळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.दिनांक २१ते२८ फेब्रुवारी या कालावधीत हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला.या काळात दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी व दुपारी गाथा पारायण, सायंकाळी हरीपाठ रात्री ७ते९ हरीकिर्तन आणि मग भोजना नंतर हरी जागर या प्रमाणे कार्यक्रम संपन्न झाले.सर्व ह.भ.प. प्रविण महाराज गोसावी,मुरारी महाराज,संदिपान महाराज शिंदे, देविदास महाराज म्हस्के,चत्तर महाराज शास्त्री, उल्हास महाराज सुर्यवंशी,अनंत महाराज तनपुरे,यांची किर्तने झाली. शेवटी दिंडी प्रदक्षिणा पूर्ण होऊन शनिवार दिनांक २८ फेब्रुवरी रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत ह.भ.प. महंत ज्ञानेश्वर माउली कराळे यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि वांढेकर परीवाराच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली. ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली कराळे यांनी आपल्या किर्तनात सांगितले की जीवाला परमात्म्या पासून वेगळं रहायला जागाच नाही. परमात्म्याला कुठलाही रंग नसतो.भक्ती ही सगुनाची केली पाहिजे निर्गुनाची नको. पाचे सर यांनी पैसा न घेता गव्हाणे बाबाचे मंदिर बांधले आहे.त्यांच्या या कार्याचे महाराजांनी विषेश कौतुक केले आणि सन्मान केला.एखादा संत महात्मा आपल्यात येतो तेव्हा त्याला कोणी ओळखत नाही,तसे आपल्या जीवाचे झाले आहे.तुमची पापं उघडी केली की निंदकाचे तोंड आपोआप बंद होतात.दोघांनी जागा सोडल्या शिवाय काला होत नाही.प्रसाद घेताना आपल्या जवळ काही ठेऊ नये.काम,क्रोध,लोभ,मद,मोह, मत्सर,हे सर्व टाकून देऊन पोटभर प्रसाद घेतला पाहिजे. स्टेजवरची मंडळी शुर असली पाहिजे.पारायण हा सप्ताहाचा अत्मा आहे.गाथा पारायणाचे शब्द थोर असतात असे अनेक दाखले देत कराळे माउली यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी राघो हिवरे गावातील सर्व ग्रामस्थ,तरुण मंडळ,भजनी मंडळ,आणि पारायण सप्ताह कमेटीने या सोहळ्यासाठी विषेश सहकार्य केले.म्हणून महाराजांनी सर्व माता, भगिनी,लहान थोर,अबाल,वृद्ध यांचें कौतुक केले.यावेळी राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय दादा कर्डिले यांनी या सोहळ्यासाठी आवर्जून हजेरी लावून आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रमाणे मी ही या राघोहिवरे गावांसाठी काहीही कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले. त्यांच्या समवेत, कुशल भापसे, एकनाथ आटकर, पुरुषोत्तम आठरे, यांच्या सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी गावातील मयत झालेल्या गोरे कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले.या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी संत ज्ञानेश्वर माउली कराळे यांचे गावात आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.नंतर त्यांच्या हस्ते राघो हिवरे गावातील चौकाचे “संत गव्हाणे बाबा चौक” असे नामकरण करण्यात आले. आणि गव्हाणे बाबांच्या नामांचा जयघोष करण्यात आला.
Home Breaking News राघो हिवरे येथे संत गव्हाणे बाबा यांच्या ३१व्या नारळी सप्ताहाची ज्ञानेश्वर माउली...








