Home Breaking News ताजनापूर येथे शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

ताजनापूर येथे शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

0

अहिल्या नगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
देवगडचे गुरूवर्य भास्कर गीरी महाराज,गुरूवर्य बालयोगी महाराज,आणि ह.भ.प. सुधिर महाराज भोसले यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ताजनापूर येथे शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १० ते १७ मे २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होत आहे.या सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन,सकाळी ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी गाथा भजन, तिसऱ्या प्रहरी प्रवचन, सायंकाळी हरीपाठ,रात्री हरी किर्तन,मध्यरात्री हरीजागर या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.सर्व ह.भ.प. भालेराव काका दारकुंडे,गौरव महाराज सोनवणे,रामहरी महाराज गावंडे, बाबासाहेब महाराज मतकर, सर्जेराव महाराज जाधव,एकनाथ महाराज सायकड, बालयोगी महाराज यांची प्रवचने होणार आहेत तर सर्व ह.भ.प.महेश महाराज खाटेकर, गणेश महाराज चौधरी,सुधिर महाराज भोसले, सचिन महाराज डौले,महेश महाराज परदेशी, राम महाराज झिंजुर्के,उमेश महाराज दशरथे, ज्ञानेश्वर महाराज करंदीकर,यांची किर्तने होणार आहेत.रविवार दिनांक १७ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत ह.भ.प.अनिल महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन होउन महा प्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.ह.भ.प. शिवाजी महाराज काळे हे या सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व करणार आहेत तर ह.भ.प. कारभारी महाराज वीर, आणि रमेश महाराज रजपूत हे काकडा भजन आणि हरीपाठाचे नेतृत्व करणार आहेत.या अखंड हरिनाम सप्ताह काळात नजन,वीर, रोडगे,आर्ले, अमृत,वाघ, शेळके,नाबदे, बेळगे,गीर्हे, पारनाईक,काळे, लंगोटे या सर्व परीवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे.अहिल्या नगर जिल्ह्यातील प्रती शिंगणापूर म्हणून या ताजनापूर येथिल शनिदेवाची महती सर्वदूर पसरलेली आहे.तरी पंच क्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ताजनापूर येथिल ग्रामस्थ आणि अखंड हरीणाम सप्ताह कमेटीच्या वतीने करण्यात आले आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here