अहिल्यानगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
राहुरी विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत विखे × पवार हा पारंपरिक संघर्ष पुन्हा एकदा नव्याने पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव,लोहसर आणि मीरी येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वर चांगलेच टिकाश्र सोडून शरसंधान साधले आहे. बारामती विधानसभा निवडणुकीत एक न्याय आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात दुसरा न्याय हा पवारांचा दुटप्पी धोरणाचा मुद्दा अत्यंत चुकीचा असून राहुरी-पाथर्डीची जनता त्यांना निश्चितच त्यांची जागा दाखवून देईल असे टिकाश्र सोडून विखेंनी पवारांवर अप्रत्यक्ष रित्या शरसंधानच साधले आहे. या निमित्ताने सन १९९१च्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील अपक्ष माजी खासदार स्व.बाळासाहेब विखे विरोधात काँग्रेसचे यशवंतराव गडाख या निवडणुकीची आठवण झाल्या शिवाय राहाणार नाही.तेव्हा पासून आजपर्यंत पवार विरुद्ध विखे पाटील घराणे यांचा पारंपरिक संघर्ष सुरू आहे. मध्यंतरी या संघर्षाची धार थोडी निवळली होती परंतु या पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती पुन्हा उफाळून आली आहे.डाॅ.सुजय विखे पाटील म्हणाले की गाफील राहिले की लोक कसा कार्यक्रम करतात यांचे जिवंत उदाहरण म्हणजे संगमनेर होय. तेथे लोकांनी सेतुवाला आमदार केला. आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत माझा ही फिट्ट कार्यक्रम केला.त्या निवडणुकीत ज्या खासदाराला लोकांनी निवडून दिलेले आहे त्यांचे नाव कोणात्या प्रकरणात येईल हे काही सांगता येत नाही.त्याचे नाव आता खरात प्रकरणांत ही सर्वात पुढे आहे. कशी टीका त्यांनी विद्यमान खासदारावर केली.विखे पुढे म्हणाले की आपल्या काळातील विकास कामांचा आलेख पहा आणि आताच्या खासदारांच्या विकास कामांचा आलेख पहा लोकांना आता पश्चात्ताप होत आहे.वांबोरी चारीचे शिल्पकार स्व.बाळासाहेब विखे पाटील हे आहेत.मुळाधरणा वरील वांबोरी चारी टप्पा क्रमांक एक,टप्पा क्रमांक दोन आणि टप्पा क्रमांक तिन कसा यशस्वी करायचा यात मी स्वतः लक्ष घालणार आहे.स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली त्या कामाची परतफेड करण्यासाठी आता आपल्याला अक्षय कर्डिले यांना एक नंबरचे बटन दाबून आमदार करायचे आहे.पाथर्डी तालुक्यातील तिन्ही मेळाव्यात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कुटुंबाचे कौतुक केले.तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवावर ही त्यांनी कार्यकर्त्यांची चांगली खरडपट्टी काढली.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणुकीत कोणाचा कसा कार्यक्रम करून न्याय मिळवून द्यायचा हे मी ठरवणार आहे.ज्यांनी लोकसभेला विरोध केला त्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल.माझ्या गाडीतच लोकसभा निवडणुकी तील लोकांची डायरी आहे.ही निवडणुक सोपी वाटत असली तरी डोळ्यात तेल घालून पहारा करा.हलक्यात घेऊ नका.कोणी कशाचीच वाट पाहू नका.पक्ष निरीक्षक आणि शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे या म्हणाल्या की अक्षय कर्डिले हे राजकारणा तील माशाचे पिल्लू आहे.त्याला पोहायला शिकवावे लागत नाही.या मेळाव्यासाठी माजी सरपंच संतोष शिंदें,जेष्ठ नेते राजू मामा तागड,एकनाथ आटकर,वैभव खलाटे,विजय कोरडे,डॉ. नंदकिशोर नरसाळे,कुशल भापसे,विजय कुटे,अण्णा शिंदे,संभाजी वाघ,एकनाथ झाडे,मयुर तागड,बबनराव नरसाळे,डॉ यशवंत गवळी, नारायण कराळे, सतिश कराळे, बाळासाहेब कोळसे,दिपक लांडगे, बापू घोरपडे,पोपट कराळे,विजया सोलाट,शोभा तुपे,पुरूषोत्तम आठरे,शिवाजी वेताळ,गौतम कराळे,संभाजी दारकुंडे, गोपीनाथ म्हस्के, शंकर शिरसाट, संभाजी झाडे, विजय गुंड, हे उपस्थित होते, चारुदत्त वाघ यांनी आभार मानले.







