मुंबई : समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट ’तर्फे ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा 2026 ’चे आयोजन करण्यात आले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारत आहे. ‘ आर्यारवी एंटरटेनमेंट ’ या संस्थेच्या माध्यमातून तेटांबे यांनी सलग चार वर्षे राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा, सेलिब्रिटी क्रिकेट मॅच असे अनेक उपक्रम राबवून ते यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. आता त्यांनी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट ’च्या माध्यमातून ‘पत्रकार, संपादक यांचा सन्मान सोहळा 2026’हा उपक्रम हाती घेतला असून मुख्य प्रवाहातील माध्यमांसोबतच ग्रामीण भागातील मुक्त वार्ताहर, साप्ताहिक-पाक्षिकांचे प्रतिनिधी, डिजिटल न्यूज पोर्टल संपादक, तळागाळातील पत्रकार, संपादक आणि सोशल मीडिया माध्यमांतून कार्यरत पत्रकारांना या सोहळ्यात विशेष व्यासपीठ मिळणार आहे. तळागाळात काम करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असून, पत्रकारितेतील निष्ठा, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.
या सन्मान सोहळ्यात ‘स्वाभिमान लेखणी सन्मान पुरस्कार ’, ‘शब्दवेध गौरव सन्मान पुरस्कार’ , ‘अजेय लेखणी सन्मान पुरस्कार ’, कलम-रत्न सन्मान पुरस्कार’ आणि ‘ निर्भीड पत्रकारिता सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी इच्छुक पत्रकार, संपादक आणि डिजिटल मीडिया प्रतिनिधींनी आपली वैयक्तिक माहिती, कार्याचा संक्षिप्त परिचय आणि छायाचित्र दिनांक 15 जून, 2026 पर्यंत आर्यारवी एंटरटेनमेंट, 7/52, दिग्विजय मिल चाळ, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई – 400033. भ्रमणध्वनी: 9082293867 / 8879810298. या संस्थेकडे पाठवावे, असे आवाहन संस्थापक महेश्वर तेटांबे यांनी केले आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख व स्थळ याबाबतची माहिती कार्यक्रमाच्या पंधरा दिवस अगोदर कळविण्यात येणार असल्याची नोंद घ्यावी, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी खालील समन्वयक यांच्याकडे संपर्क साधावा.
श्री. गुरुनाथ तिरपणकर (पत्रकार) – 9323662619
श्री. राहुल खरात (पत्रकार) – 8308809754
श्री. केतन भोज (पत्रकार) – 8369554418, 8879544540










