Home Breaking News ठेंगोडा येथे नवभारत फर्टिलाइजर कंपनी तर्फे सेन्द्रिय शेती वर मार्गदर्शन

ठेंगोडा येथे नवभारत फर्टिलाइजर कंपनी तर्फे सेन्द्रिय शेती वर मार्गदर्शन

0

देवळा (  प्रतिनिधी प्रशांत गिरासे) ठेंगोडा येथे नवभारत फर्टिलाइजर कंपनी तर्फे सेन्द्रिय शेती वर मार्गदर्शन आणि नव भारत फर्टिलायझर कंपनीचे ब्रांच मॅनेजर प्रवीण मगर व प्रशांत बागुल व अॅग्रीकलचर ऑफिसर वैभव बागुल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सदर मेळाव्यात उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कांदा, तूर, मका, सोयाबीन, पपई व इतर पिकांवर वाढत्या रासायनिक खतांंचा वापर कमी करून जैविक सेंद्रीय पद्धत अवलंब करणे शेतीसाठी गरजेचेअसून या कडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे हे गरजेचे झाले आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अती वापरामुळे शेतीची ग्रोथ कमी होत आहे. त्यामुळे मातीतील सुक्ष्मद्रव्य कमी होऊन परिणामी शेती नापीक होत असुन खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी पिकाच्या आवश्यकते नुसार खतांचा वापर करावा, व अति घातक किटनाशक यांचा सुरवातीला वापर टाळावा तसेच या महागड्या फर्टिलायझर्स व किटकनाशकांचा वापर कमी करून शेतकऱ्यांनी जैविक व सेंद्रिय शेती करावी सेंद्रिय खतांचा वापर केल्याने आपली शेतजमीन सुपीक होऊन परिणामी कमी खर्चात जास्त उत्पादन मिळणार तसेच प्रेस्टिसाईडमुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम होणार नाही. तसेच शेतकरी बांधवांना आपल्या पिकाला योग्य बाजारभाव पण मिळेल असे यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी शेतकऱ्यांना जैविक व सेंद्रिय शेती करण्याबाबत आवाहन केले व त्यानंतर शरद बागुल यांच्या नावाने कंपनीच्या खतांची बुकिंग करून त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी गावातील शेतकरी शरद बागुल, लक्ष्मण बागुल, सुभाष बागुल, सिताराम बागुल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here