शासकीय मदतीचा ४ लाख रुपये किमतीचा धनादेश आज आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते प्रदान

0

मनमाड : गेल्या महिनाभरापूर्वी खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाला होता.त्या गायकवाड कुटूंबाला आज शासकीय मदतीचा ४ लाख रुपये किमतीचा धनादेश आज आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.घटना घडल्याच्या आठवड्यातच आ. सुहास कांदे यांनी खादगाव येथे जाऊन या आपदग्रस्त कुटूंबाचे सांत्वन करत रोख ५० हजार रुपये, २ क्विंटल धान्य,सहा महिने पुरेल इतका किराणा सुपूर्द केला होता.या मयत विलास गायकवाड च्या कुटूंबात वृद्ध आई – वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, दीड महिन्याची मुलगी असा परिवार आहे. या सर्वांची जबाबदारी लोकांच्या शेतात मजुरी करून पार पाडत होता. मात्र गेल्या आठवड्यात या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यावेळी विलास गायकवाड हा मका लागवड करण्याच्या कामासाठी शेतात जात असताना त्याच्यावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू ओढवला होता.
. आज या चार लाख रुपयांचा धनादेश आमदार सुहास कांदे यांचे हस्ते मयत विलास ची पत्नी सोनाली गायकवाड यांना देण्यात आला.यावेळी तहसीलदार सुनील सौंदाणे, संग्राम बच्छाव, फरहान खान, प्रमोद भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, सोमनाथ घुगे, शरद दराडे, सूर्यभान यमगर, संजय वडक्ते, दत्तू दराडे,भाऊसाहेब घुगे,दगडू गायकवाड,जंगलू गायकवाड, समाधान पगार, मंगेश सांगळे,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here