हातभर तक्रारीचा बोटभर उपाय”या बँनरखाली जिल्हा पोलीस दलाच्या चुकीच्या कारभाराच्या विरोधात डोक्यावर गाडगे घेऊन खा.लंकेचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आंदोलन!अनेक पोलिस अधिकाऱ्यांची पर जिल्ह्यात उचलफेक!

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर, अहमदनगर जिल्हा) “हातभर तक्रारीचा बोटभर उपाय” या बँनरखाली अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या चुकीच्या गैरकारभाराच्या विरोधात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेशजी लंके यांनी डोक्यावर भ्रष्टाचाराची मडकी या आशयाचे फलक लावलेले गाडगे हातात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आंदोलन सुरू केले होते. खासदार लंके यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील पोलिसांच्या विरोधात सामांन्य नागरीकाच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी साठी एक हाँटसाप नंबर उपलब्ध करून देउन लोकांच्या तक्रारी त्या नंबर वर पाठवण्याचे आवाहन केले होते.जिल्ह्यातील पोलीस दलाच्या विरोधात तक्रारीचा अक्षरशः पाउसच पडला.त्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक राँकेशजी ओला साहेब यांच्या कडे पाठवून त्याची शहानिशा होणार आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अक्षरशः लक्तरेच या तक्रारी द्वारे खासदार लंकेसाहेब यांनी बाहेर काढून वेशीवर टांगली होती.पत्रकाराशी संवाद साधताना खासदार निलेश लंके यांनी काही निवडक तक्रारी प्रसार माध्यमाशी शेअर केल्या ते म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत.हप्तेखोरीचे अनेक पुरावे आमच्या कडे आहेत.गुटख्याच्या अनेक गाड्या सोडून दिल्या जात आहे.ट्रक चालक लुटले जात आहेत.श्रीगोंदे तालुक्यातील एका भोसले नावाच्या पोलिसांनी एका मुस्लिम समाजाच्या घरात जाउन गायीचा गोठा बंद करून त्याची उपजिविकाच बंद केली आहे.पोलिसांची कायद्याच्या विरोधातील सरंजामशाही वाढलेली आहे.सामान्य लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत.पोलीस दलातील काही निवडक कर्मचारी,अधिकारी,पैसे गोळा करण्यात मश्गूल झाले आहेत.मी जेव्हा लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून ऊभा होतो तेव्हा निवडणूक काळातील माझ्या सर्व मोबाईलचे रेकॉर्डिंग पोलिसांनी काढले.ही अतिशय धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक आणि गुन्हा अन्वेषण विभागातील पोलीस दलाची हातचलाखी उजेडात आली.वादग्रस्त पोलीस निरीक्षक यांची तात्काळ बदली करण्यात यावी.त्यांच्या कडील अतीरिक्त कारभार काढून घेण्यात यावा ही प्रमुख मागणी असल्याचे खासदार निलेशजी लंके यांनी सांगितले.जो पर्यंत जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद होण्यासंदर्भात काही ठोस निर्णय होत नाहीत तोपर्यंत भ्रष्टाचाराचे हे गाडगे डोक्यावर घेऊन जिल्हाभर हे आंदोलन सुरू राहणार आहे असे खा.लंके यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील भगवान फुलसौंदर,विक्रम राठोड, अभिषेक कळमकर,किरण काळे, प्रकाश पोटे,दिलिप सातपुते, सुदाम पवार,बाळासाहेब खिलारी,बाबासाहेब तरटे,सुवर्णा घाडगे, राहुल झावरे,चंद्रभान ठुबे,अभयसींह नांगरे,ज्ञानदेव लंके,प्रा.संजय लाकूडझोडे,यांच्या सह अनेक तक्रारदार कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राँकेशजी ओला साहेब यांनी निर्णय घेऊन तडकाफडकी जिल्हा पोलिस दलातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या ईतर जिल्ह्यात बदल्या केल्या असल्याचे सांगितले. नाशिक परीक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, अशा एकूण ४१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ईतर जिल्ह्यात केल्या आहेत.१९ जुलैच्या रात्री उशिरा हे आदेश काढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील (२०) पोलीस अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवून परजिल्ह्यात बदलीद्वारे उचलफेक केली आहे.मात्र एका सहाय्यक पोलीस निरिक्षकाला जिल्ह्यातच अकार्यकारी पदावर मुदतवाढ दिली आहे.जिल्ह्यात (१६)अधिकारी नव्याने बदलून आले आहेत.तसेच अहमदनगर जिल्ह्यात विनोद खांडबहाले,संदिप मुरकुटे, रोशन निकम, प्रविण महाले,हे पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत.जळगाव येथून पोलीस निरीक्षक किरण शिंदे हेही नगर येथे नव्याने बदलून आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून बदली झालेले पोलीस अधिकारी पुढील प्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांची (नाशिक ग्रामीण),सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र पिंगळे यांची (जळगाव),विश्वास पावरा (नंदुरबार),हेमंत काळे, (नाशिक ग्रामीण),विवेक पवार (मुदतवाढ),संभाजी पाटील (नाशिक ग्रामीण),नितीन रणदिवे(जळगाव),प्रमोद वाघ (जळगाव),मयुर भांबरे(धुळे),सागर काळे(नाशिक ग्रामीण),अनिल बागुल (धुळे),गौतम तायडे नाशिक ग्रामीण),पोलीस निरीक्षक समाधान सोळुंके (धुळे),मनोज महाजन (जळगाव),सोपान गोरे (जळगाव),निकिता महाले (धुळे),समाधान भाटेवाल (धुळे),निरंजन बोकिल(जळगाव), संतोष पगारे(नंदुरबार),राहुल सानप (जळगाव),अतुल बोरसे (नाशिक ग्रामीण),या पोलीस अधिकाऱ्यांच्या ईतर जिल्ह्याच्या ठिकाणी बदल्या केल्या आहेत.खासदार निलेशजी लंकेसाहेब यांनी वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.या तक्रारग्रस्त अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळलेल्या सर्व सामांन्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जिल्ह्यातील ईतर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या पासून बोध घेऊन आपल्या विरोधात कोणाची ही तक्रार येणार नाही याची नोंद घेणे आवश्यक आहे.सरंजामशाहीच्या विरोधात लंकेंचा डंका संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात वाजू लागला आहे.अशी कुजबुज सर्वत्र ऐकू येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here