शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाच्या वतीने पडळकर, विखे,दानवे,राजळेंचा सन्मान सोहळा संपन्न!

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) विधानसभा निवडणुक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे. सरकारकडून धनगर समाजाला मागील निवडणुकीत आश्वासन दिल्यानंतर ही एसटी आरक्षण न दिल्याने धनगर समाजाने लोकसभा निवडणुकीत आपला राग व्यक्त करीत महाविकास आघाडीला मतदान करून महायुतीच्या नेत्यांना चांगलाच धडा शिकवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. याची महायुतीच्या नेत्यांकडून गंभीरपणे तात्काळ दखल घेतली गेली.मतदार संघातील धनगर समाजातील सर्व प्रमुख नेत्यांना एकञ करीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.स्वर्गीय राजीव राजळे यांच्या काळापासून कार्यरत असलेल्या जुन्या नव्या धनगर समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्त्यांचा या मेळाव्यात समावेश होता.भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नवनाथ पडळकर यांनी यावेळी भाजपला मतदान करून आमदार मोनिकाताई राजळे यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. हाच धागा पकडून शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथिल बिरोबाभक्त बाबाजी बनसुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
अमरापूर येथे झालेल्या जाहीर प्रचारसभेत भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रचार प्रमुख माजी मंञी रावसाहेब दानवे,महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,अमरापूर येथील भाजपच्या नेत्या आशाताई गरड,आणि विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांना यळकोट येळकोट चा नारा देत भंडारा लावून काठी अन् घोंगडी देऊन सन्मानित करण्यात आले होते. आणि”हमआपके साथ है” चा संदेश देत मतदार रूपी आशिर्वाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here