नाशिक : “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीला झोनल लेव्हल अविष्कार स्पर्धेत कांस्य पदक पारितोषिक”
एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीने १० नोव्हेंबर २०२४ रोजी जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पार पडलेल्या झोनल लेव्हल अविष्कार स्पर्धेत सहभाग घेतला. अविष्कार ही एक प्रमुख शैक्षणिक संशोधन स्पर्धा असून, यामध्ये विविध महाविद्यालयांतील विद्याथ्यांनी आपली शोधपरक कल्पकता आणि संशोधन प्रकलप सादर केले. या स्पर्धेत एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये साक्षी गिरी, पूजा कुंभार ,भूमि चव्हाण आणि अथर्व कराळकर यांचाही सहभाग होता. त्यांच्याही प्रकल्पांना महत्त्वाची प्रशंसा मिळाली. परंतु, या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे भूमी चव्हाण आणि अथर्वं कराळकर यांना तिसरें कांस्य पदक पारितोषिक मिळाले. या यशामुळे कॉलेजला अभिमान वाटला आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे फळ मिळाल्याचे स्पष्ट झाले. एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कॉलेजच्या संशोधनाच्या वातावरणाला प्रोत्साहन मिळाले असून इतर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल.
या स्पर्धेत एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रमुख प्रशिक्षक होते डॉ. रुपाली ढिकले मॅम आणि डॉ. अमर झाल्टे सर. त्यांचा मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकल्प सादर केले.स्पर्धेतील यशानंतर एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीच्या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.नरेंद्रभाई ठक्कर, सचिव मा. श्री. देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, संस्थेचे संयुक्त सचिव मा. श्री. अभयभाई चोक्सी व प्राचार्य. डॉ. विशाल गुलेचा आणि इतर सर्व शिक्षकांनी भूमी आणि अथर्वं त्यांच्या यशाचे कौतुक केले असून विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांच्या कष्टाची आणि योगदानाची प्रशंसा केली. यशस्वी विद्यार्थ्यांनी संस्थेचे नाव उज्जवल केले आहे.या स्पर्धेने विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक सादरीकरणाची संधी दिली नसुन ,तर त्यांना इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्याचीही चांगली संधी प्राप्त करून दिली. एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांना संशोधन आणि नाविन्याच्या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी नेहमीच प्रेरित करत आहे.
Home Breaking News “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीला झोनल लेव्हल अविष्कार स्पर्धेत कांस्य...