अहमदनगर (सुनिल नजन “चिफ ब्युरो”अहिल्यानगर) जाती पातीचा किडा डोक्यात न ठेवता मला मतदान करा आणि साखर सम्राटांना घरी पाठवा असे आवाहन शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सौ.हर्षदाताई काकडे यांनी केले त्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत बोलत होत्या. त्यांनी केलेल्या विकास कामाची माहीती चित्र फितीच्या द्वारे स्क्रीन वर दाखवून देत मतदारांची मने जिंकून घेतली. साखर सम्राटांनी अजूनही शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट दिले नाही.आणि तुमच्या उसाच्या पैशातून हे निवडणूक लढवित आहेत.असा आरोप सौ.हर्षदाताई काकडे यांनी केला. शेवगाव तालुक्यातील अनेक गावे हे पिण्याच्या पाण्याविना तडफडत आहेत आणि विरोधी उमेदवार हे आता निवडणूका आल्यावर परिवर्तन करायला निघाले आहेत.शेवगाव तालुक्यातील एम आय डी सी चा प्रश्न प्रलंबित कोणी ठेवला त्यांनाच आता मत मागायला आल्यावर हा जाब विचारा. रोहयो च्या विहीरी मंजूर करण्या साठी साठ साठ हजार रूपये कोणी घेतले त्यांना आता या निवडणूकीत धडा शिकवा. मी वचननामा दिला आहे.या पाच वर्षांत पिण्यासाठी स्वच्छ पाणी,तरुणांच्या हाताला काम, एम आय डी सी,चा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे पण विद्यमान लोकप्रतिनिधीं कडून परवानगी मिळाली नाही असा आरोप सौ.हर्षदाताई यांनी केला.या वेळी एकनाथ वाडी येथील विजय खेडकर, विनोद खेडकर, राजू आंबेकर,विष्णू खेडकर, नामदेव ढोबळे,दत्ता राख या कार्यकर्त्यांनी काकडे यांना पाठींबा देत जनशक्ती विचार मंच मध्ये जाहीर प्रवेश करून मतदारसंघातून भरघोस मताची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. निवडून आल्यानंतर मात्र मी जनतेला विचारल्या शिवाय कोणालाही पाठिंबा जाहीर करणार नाही असे सौ. काकडे यांनी या सभेत सांगितले. या सभेसाठी प्रारंभी भाऊसाहेब पोटफोडे यांनी प्रास्ताविक केले. रामकिसन घनवट, रावसाहेब मडके,गिरीजाताई निकम, लक्ष्मण गवळी,दादू गायकवाड, प्रुथ्वीसींह काकडे,राजूमामा फलके, जगन्नाथ पाटील गावडे आणि पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संखेने आवर्जून उपस्थित होते. सुरुवातीलाच सौ.काकडे यांची अमरापूर गावातून फटाक्याच्या आतषबाजीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. या सभेला प्रचंड प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. आभार निकम सर यांनी मानले.