श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित“एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीमध्ये पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

0

नाशिक : श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित“एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीमध्ये पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला,श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या “एस. एन. पी. टी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,” नाशिक येथे 29 मार्च 2025 पालक-शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळावाचे उद्दिष्ट विद्यार्थींचे मनोबल वाढवणे आणि त्यांना उत्तम शैक्षणिक कार्यक्षमतेसाठी प्रोत्साहित करणे हे होते. मेळावाची सुरुवात डॉ.मनीषा तायडे यांनी केली. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेची बांधिलकी आणि गुणवत्ता शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. तसेच प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती दिली. आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नां बद्दल चर्चा केली. तसेच, विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि व्यावसायिक मूल्यांच्या विकासासाठी संस्थेची वचनबद्धता यावर त्यांनी प्रकाश टाकला.
पालक आणि शिक्षक यांच्यात संवाद वाढवण्यासाठी विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यासत्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, त्यांच्या आव्हानांवर चर्चा करण्यात आली आणि त्यांचे निराकरण कसे करावे यावर मार्गदर्शन केले गेले. तसेच, विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याच्या बाबतीत पालक आणि शिक्षकांनी कसे सहकार्य करावे यावर सत्रे आयोजित करण्यात आली. बैठकीच्या शेवटी, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि शैक्षणिक उत्कृष्टतेची प्रेरणा वाढली.या बैठकीमुळे पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद वाढला, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल जागरूकता वाढली आणि संस्थेच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकजूट वाढली. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्षमा. श्री.नरेंद्रभाई ठक्कर, सचिव मा. श्री. देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, संस्थेचे संयुक्त सचिव मा. श्री. अभयभाई चोक्सी यांनीशुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here