पोलिस वा ‘खाकी वर्दी’ म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर उभी राहते.

0

मुंबई : पोलिस वा ‘खाकी वर्दी’ म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापटस्वभावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकाऱ्याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले, तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने प्रसंगी मदत करतात, सल्ला देतात, पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं असे उदगार मराठी वृत्तपत्र लेखक संघांचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी काढले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस प्रमुख राजेंद्र आव्हाड साहेब यांचा मालुसरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम घुगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर वैशाली रोडवेजचे मालक शिवाजीशेठ उगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद काकड साहेब, ताडदेव व्यायामशाळेचे सेक्रेटरी सुरेश सांगळे, योगेश कराड, हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.खाकी वर्दीतील देव माणूस हे वाक्य साजेल व पोलीस दलाची मान उंचावेल असे काम राजेंद्र आव्हाड यांच्या हातून होत असते, भविष्यात अशा धडाडीच्या कामगिरीमुळे व उत्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर होऊन त्यांना गौरविण्यात यावे अशी अपेक्षा मालुसरे यांनी व्यक्त केली. तर दत्ताराम घुगे म्हणाले की, महाराष्ट्र नशीबवान आहे. प्रशासनात आजही त्यांच्यासारखे असे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं माणूसपण सुटलेलं नाही. त्यांनी केलेल्या या कामाबद्दल जेव्हा विचारले जाते तेव्हा ते विनम्रपणे सांगतात की, मी फक्त माझं कर्तव्य करतो… वेगळं काहीच नाही. पोलिसांना जात नसते ना धर्म असतो. लोकांचं रक्षण, त्यांच्या मदतीला धावणे हाच त्यांचा खरा धर्म असतो. त्यामुळे मानवता हा एकच धर्म मी मानतो. समाजात आपल्या हातून चांगले कार्य घडावे हीच अपेक्षा व जाणीव ठेवून आम्ही काम करीत असतो.मुंबई सायबर सेलच्या अनिता नामदेव आव्हाड यांचा अकादमीच्यावतीने तर जागतिक महिला दिनानिमित्त नंदिनी नंदकुमार पाटील यांच्या कलाश्रम संस्थेच्या वतीने सौ. मंदाकिनी शि. उगले यांना मधुरा वेलणकर- साटम यांच्या माधुरी घुगे स्मृती पुरस्काराने गौरविल्याबद्दल त्यांचाही यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here