जवखेडेच्या यात्रेत दंगा कराल तर याद राखा, कोणत्याही जाती धर्माच्या दंगेखोराला पोलिस सोडणार नाहीत : शांतता समितीच्या बैठकीत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचा इशारा

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) जवखेडे खालसा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथिल गावच्या यात्रेत जर दंगा कराल तर याद राखा, कोणत्याही जाती धर्माच्या दंगेखोराला पोलिस सोडणार नाहीत असा इशारा पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला.हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या कान्होबा उर्फ तांबुळदेवाची यात्रा ही पाडव्याच्या दिवसांपासून सलग तिनं दिवस असते. त्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व नागरिकांसाठी शांतता समितीची बैठक जवखेडे खालसा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे होते. यात्रा काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत असे सुचविण्यात आले.जेष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट लतिफभाई शेख यांनी गावच्या यात्रेची रुपरेषा सांगितली.ते म्हणाले की तीस तारखेला पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे वाजत गाजत पैठण येथुन कावडीने आणलेल्या पाण्याने तांबुळदेवाला महाजलाभिषेक करण्यात येणार आहे.व रात्री संदल मिरवणूक होणार आहे.एकतीस तारखेला रमजान ईद च्या दिवशी रात्री सात ते दहा वाजेपर्यंत छबिना मिरवणूक होणार आहे. अनेक प्रकारच्या फुलांच्या चादरी आणि माळा कान्होबा देवाला अर्पण करण्यात येणार आहे.फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशा व तोफांच्या सलामीत ही पालखी मिरवणूक होणार आहे. एक एप्रिल रोजी सकाळी हजेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.आणि सायंकाळी चार वाजता गावातील गावठाणातील मैदानात राज्यातील गाजलेल्या नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांचा हंगामा होणार आहे.असे या यात्रेचे स्वरूप असणार आहे.शांततेच्या मार्गानं ही यात्रा पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले शेख वकील साहेब यांनी केले.प्रारंभी ॲडव्होकेट वैभव आंधळे यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत केले.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब म्हणाले की ही यात्रा एकमेकांचे हेवेदावे काढण्यासाठी नाही.कागदोपत्री जे नाव आहे “कान्होबा उर्फ तांबुळदेव “याच नावाचा वापर सर्वांनी करावा.देवाला ज्या भाविकाला ज्या रंगाचा गलफ टाकायचा असेल त्यांना तो टाकू द्यावा कोणालाही आडकाठी आणू नये.आडकाठी आणणाऱ्यास आचार संहितेचा भंग केला म्हणून पुढील कार्यवाही केली जाईल. पैठणहुन येणाऱ्या कावडीसाठी जो मानाचा झेंडा वापरला जाईल त्याला एका बाजूने हिरवा आणि दुसऱ्या बाजूला भगवा कपडा वापरून तो मानाचा निशान झेंडा तयार करावा.तो हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे.तो गावच्या द्रुष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे.एकेरी रंगाच्या कापडाचा वापर करून निशाण तयार करू नये.यात्रेत एकमेकांचे हेवेदावे काढू नयेत.यात्रेसाठी जी आचार संहिता तयार केली होती तीचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे.ही यात्रा शांततेने सद्भावनेतून साजरी व्हावी, जवखेडे खालसा गावात जातीय सलोखा आणि शांतता निर्माण करावी आणि शक्यतो वादग्रस्त विषय टाळावेत असे आवाहन पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी केले.जेष्ठ नेते उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत उपनिरीक्षक भोये साहेब,पो.कॉं.आदिनाथ बडे,पो.कॉं.प्रल्हाद पालवे,गोपनीय विभागाचे प्रमुख नागेश वाघ,सरपंच चारूदत वाघ, शाबुद्दीनभाई शेख,अमोल वाघ,ईसाक शेख,विष्णू घाटूळ,ताजू शेख, तुषार वाघ, इरफान शेख, रामनाथ आव्हाड,मुस्ताक शेख,रघुनाथ लांघे,सरदार बाबा, राजेंद्र वाघ,राजू शेख,विठ्ठलराव लांघे,चांदभाई शेख, राजेंद्र मतकर सर,ग्रामसेवक पडोळे साहेब यांच्या सह गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here