अहमदनगर (सुनिल नजन चिफब्युरो/ अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) अ.नगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या मार्केट कमिटीचे सभापती सुभाषराव बर्डे आणि उपसभापती कुंडलीकराव आव्हाड यांनी तोट्यात असलेली मार्केट कमिटी हळूहळू चांगल्या प्रकारे नफ्यात आणलेली आहे अशी ग्वाही शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.त्या तिसगाव उपबाजार समितीच्या आवारातील नवीन भुईकाट्याच्या भुमिपुजना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती आणि जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे हे होते.आमदार राजळे पुढे म्हणाल्या की या नवीन संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली पाथर्डी मार्केट कमिटीचा चांगला पारदर्शी कारभार सुरू आहे. पाथर्डी, खरवंडी, तिसगाव, टाकळी मानूर, आणि आता सर्वांनी चांगले सहकार्य केले तर मीरीच्या दिशेने पाऊल टाकता येईल असे सांगून संचालक मंडळाच्या निवडणुकीत जे आश्वासन दिले होते ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले. सभापती सुभाषराव बर्डे म्हणाले की एक कोटी ९० ते ९५ लाख रुपयांचे उत्पन्न वाढले आहे.या वर्षी निव्वळ नफा एक कोटीच्या पुढे राहील.तसेच संस्थेने प्रथम एक कोटी सत्तर लाख रुपयांची एफ डी केलेली आहे.पणन महामंडळाकडून पैसे कसे मिळतील या साठी हे काम केले आहे.पाथर्डी पंचायत समितीचे दुसरे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर यांनी संस्थेच्या मागिल कार्याचा लेखाजोखा मांडला. या नवीन भुईकाटा बसविण्याच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमा प्रसंगी उपसभापती कुंडलीकराव आव्हाड यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांचा सन्मान केला.यावेळी रामकिसन काकडे, सुभाषराव ताठे, शेषराव कचरे, दत्तू मराठे, भाऊसाहेब लोखंडे, इलियास शेख,श्रीकांत मिसाळ,कुशिनाथ बर्डे, पोपट कराळे,जीजाबा लोंढे, एकनाथ आटकर,
,पुरुषोत्तम आठरे, सुनिल पुंड,रफिक शेख, महेश अंगरखे,सुनिल ओहळ,सचिव बाळासाहेब बोरूडे हे आवर्जून उपस्थित होते.सुत्रसंचालन नारायण पालवे यांनी केले.तर आभार वैभव खलाटे यांनी मानले.एकंदरीत पाथर्डी मार्केट कमिटीच्या विकास कामांची घौडदौड अतिशय वेगाने वाढत असल्याने आमदार मोनिकाताई राजळे यांनी समाधान व्यक्त केले.
Home Breaking News बर्डे-आव्हाड यांनी तोट्यात असलेली मार्केट कमिटी हळूहळू चांगलीच नफ्यात आणलेली आहे, तिसगावातील...