Home Breaking News श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित, एस. एन. पी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी...

श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित, एस. एन. पी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई विभागाकडून परीक्षा केंद्र प्रदान

0

नाशिक : श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित, एस. एन. पी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई विभागाकडून परीक्षा केंद्र प्रदान करण्यात आले,
संस्था क्रमांक: २०१४,श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित, श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी महाविद्यालयात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून औषधनिर्माणशास्र पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना सोयीस्कर होण्यासाठी महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई विभागाकडून परीक्षा केंद्र प्रदान करण्यात आले आहे.
संस्थचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रभाई ठक्कर व उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशभाई पटेल, सचिव मा. श्री. देवेंद्र पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, उपसचिव मा. श्री. अभयभाई चोकसी, महाविद्यालयाचे दाता विश्वस्त मा. श्री राजेश भाई ठक्कर तसेच इतर पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देऊन कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here