Home Breaking News श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीने...

श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीने “ ब्लू क्रॉस लॅबोरेटरीजला”औद्योगिक भेठ

0

नाशिक : श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीने “ ब्लू क्रॉस लॅबोरेटरीजला”औद्योगिक भेठ दिली,
श्री.पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित, “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीच्या तिसऱ्या वर्षाच्या बी. फार्मसी आणि पहिल्या वर्षाच्या डी. फार्मसी विद्यार्थ्यांनी ४ एप्रिल २०२५ रोजी नाशिकमधील ब्लू क्रॉस लॅबोरेटरीजला एक अत्यंत शिक्षाप्रद औद्योगिक भेट दिल्याची माहिती प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा यांनी दिली. भेटीमध्ये शिक्षक श्रीमती अनिता शिंदे, श्री ईश्वर वैष्णव आणि श्रीमती वैशाली भामरे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल उद्योगाशी संबंधित प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांचे पाठ्यपुस्तकांवरील ज्ञान आणखी विस्तृत आणि सखोल झाले. ब्लू क्रॉस लॅबोरेटरीजच्या कार्यपद्धतींनी विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, आणि अत्याधुनिक फार्मास्युटिकल तंत्रज्ञानावरील सखोल माहिती दिली.या भेटीला श्री मिलिंद जगताप सर आणि कृष्णा चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या अमुल्य वेळ आणि सखोल स्पष्टीकरणामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या कार्यपद्धतीची उत्तम समज मिळाली. विद्यार्थ्यांनी या औद्योगिक भेटीबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केले.संस्थचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रभाई ठक्कर व उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशभाई पटेल, सचिव मा. श्री. देवेंद्र पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, उपसचिव मा. श्री. अभयभाई चोकसी, महाविद्यालयाचे दाता विश्वस्त मा. श्री राजेश भाई ठक्कर तसेच इतर पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देऊन कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here