Home Breaking News कोपरे येथे रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण...

कोपरे येथे रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन!

0

अहमदनगर :  (सुनिल नजन “चिफब्युरो”/ अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) ‌ वैकुंठवासी संत भगवान बाबा,वै.वामनभाउ महाराज,वै.सदगुरु यादव बाबा,वै.नारायण महाराज,वै.बाळूमामा या संत महंतांच्या आशिर्वादाने अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवा निमित्त दिनांक 5 ते 12 एप्रिल या कालावधीत चोविसाव्या वर्षातील अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व ह.भ. प.दत्तात्रय महाराज राजळे,ठकाजी महाराज दिंडे, संजय महाराज वारे, शिवाजी महाराज चन्ने, महादेव महाराज आव्हाड,सुर्यभान महाराज केसभट यांची प्रवचने होणार आहेत तर सर्व ह.भ.प.रविंद्र महाराज मदने,संजय महाराज वारे,वैष्णवी महाराज वाघमोडे, अभिमन्यू महाराज भालसिंग,महेश महाराज आव्हाड, ऋतुजाताई कासार, सुदर्शन महाराज उदासीन, संजय महाराज बिलावत यांची किर्तने होणार आहेत.शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता दिंडी प्रदक्षिणेत ग्रंथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. हनुमान जन्मोत्सवा निमित्त शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत डोंगर वाडीच्या श्रीराम संस्थान चे प्रमुख ह.भ.प.लक्ष्मण महाराज कराड यांचे काल्याचे किर्तन होउन श्रीपती उघडे,राजेंद्र उघडे, सुभाष उघडे, नाथा खरात,भागिनाथ दिंडे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.वरील काळात दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी वाचन,दुपारी चार वाजता प्रवचन, सायंकाळी हरीपाठ, रात्री सात ते नऊ हरीकिर्तन आणि नंतर महाप्रसादाची पंगत, नंतर हरीजागर या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.उघडे, वाघमोडे,ढाकणे,माने, आव्हाड,खेडकर या परीवाराच्या वतीने दररोज सकाळ संध्याकाळ पंगतीचे आयोजन करण्यात आले आहे.शंकर उघडे यांची जयमल्हार साउंड सिस्टीम संपूर्ण सप्ताहात आवाजाचं नियोजन करणार आहे.‌वाघोलीच्या वै.यादवबाबा संस्थानचे प्रमुख ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसींग,महेश महाराज आव्हाड, वैष्णवी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.‌ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ह.भ.प. दत्तात्रय महाराज राजळे हे चालवणार आहेत. कोपरे येथील हनुमान मंदिरा समोर होणाऱ्या सप्ताहातील या सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त भजनी मंडळ आणि कोपरे गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. हनुमान जन्मोत्सवा निमित्त पौर्णिमेच्या दिवशी पैठण येथुन कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने भल्या पहाटे हनुमान मुर्तीला जलाभिषेक करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here