आषाढी एकादशी निमित्ताने वृक्षारोपण,पाट्या व डिश वाटप

0

सुरगाणा, प्रतिनिधी- सुरगाणा तालुक्यात आषाढी एकादशी निमित्ताने ठाणगांव ता. सुरगाणा येथील अंगणवाडी शाळेत पाट्या ,डिश वाटप तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन प्रहार संघटना, देवा गृप, सुरगाणा यांच्या मार्फ़त करण्यात आले.
बालपणापासून अभ्यासा बरोबरच निसर्ग प्रेमाची आवड विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचें आयोजन करण्यात आले होते, तसेंच शासना मार्फ़त देण्यात येणारा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना शाळेतच खाता यावा म्हणून डिश वाटप करण्यात आल्या .
या शुभ कार्यक्रमा प्रसंगी अंगणवाडी सेविका ताई महाले, संगीता महाले, मदतनीस कौशल्या डोळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप महाले, मनोहर जाधव, कमलेश वाघमारे, कल्पेश वाघमारे, संदीप धुम,मंगेश चौधरी,दिलीप गुंबाडे,राहुल भोये, हंसराज भोये, दिपक भोये, भगवान दळवी, पत्रकार नामदेव पाडवी तसेंच महिला पालक वर्ग व पालक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here