सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) भाऊ- बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, दरवर्षी या सणाला विवाहीत महिला सासरहून आपल्या भावाला राखी बांधायला माहेरी येत असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी दिसत असे,माञ यावर्षी या सणावर कोरोनाच्या वाढत्या ससंर्गामुळे व बाहेरगावी जाणे-येण्याचे साधन उपलब्ध नसल्यामुळे बहीणीने आपल्या लाडक्या भाऊरायासाठी अत्यंत घरगुती पध्दतीने राख्या बनवून पोस्टाने पाठविणे पसंत केले आहे.
कोरोणामुळे रक्षाबंधन सणाच्या आनंदावर विरजण पडल्याचे चिञ तालुक्यातील पसरात दिसुन आले.
तालुक्यातील परीसरात साध्यापध्दतीने कोरोनाच्या सावटाखाली रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.