किटकनाशक फवारलेल्या शेंगा खाल्याने वानराचा मृत्यू झाला

0

सिल्लोड (प्रतिनिधी  विनोद हिंगमीरे ) अंभई येथे मंगळवारी सकाळी किटकनाशक फवारलेल्या शेंगा खाल्याने वानराचा मृत्यू झाला आहे सध्या सर्वत्र शेतीचे कामे चालू आहे अशातच शेतराणात वाणराचाही वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे मंगळवारी सकाळी असेच एका वानराने विषारी औषध फवारलेल्या मूंगाच्या शेंगा खाल्या यानंतर सदरील वानराला चक्कर येवू लागल्याने परिसरातच शेतात काम करत असलेले शेतकरी अनिल राऊत यांच्या ही बाब लक्षात येताचत्यांनी प्रथम त्वरीतच आयूर्वेदिक उपचार केले यानंतर सदरील वानरास दूध बिस्कीटे आदि पदार्थ ही खाण्यास दिले परंतू अथक परिश्रम घेऊनही वानराने अखेर आपले प्राण सोडले यानंतर राऊत यांनी हजर असलेल्या सहकार्याने सदरील वानराचा पारंपारीक प्रथेनूसार अंत्यसंस्कार केले गेल्या आठ दिवसात याच प्रकारे चार वानराचा मृत्यू झाला असल्याने शेत परिसरात अनेक वानराचे कळप फिरत असल्याने असे प्रकार घडत आहे या वानराचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे अंत्यसंस्कार करण्यासाठी अनिल राऊत राजू चव्हाण गजानन चव्हाण शेखर कठाळे चेतन चव्हाण संतोष सोनवणे यांनी पूढाकार घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here