
सिल्लोड( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) भराड़ी,पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ. संजय गायकवाड यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय क्रांतीज्योती सावित्रीमांई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्यानिमित्त तळनी येथे सरस्वती माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात प्राचार्य अशोकदादा गरुड़ यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.डॉ.गायकवाड २४ वर्षांपासून इंग्रजी विषयाच्या अध्यापनाचे कार्य, प्रेरणादायी लेखन, व्याख्यान, इंग्रजी विषयान्तरगत संशोधनात्मक लेखन,सामाजिक शैक्षणिक उपक्रम.जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर त्यांनी विविध प्रशिक्षणात साधन व्यक्ती म्हणून काम, कोव्हीड -19 कालावधित इयत्ता बारावीचा शंभर टक्के अभ्यासक्रम त्यांनी ऑनलाईन उपलब्ध करून दिला. ‘द स्मार्ट इंग्लिश’ ॲपच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपयोगी असे कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले. कोविड-१९ महामारीच्या काळात ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न केला. समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक अनेक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना माध्यमिक विभागातून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणगौरव पुरस्कार घोषित केला. त्यानीमित श्री. अशोकदादा गरुड़ शैक्षणिक व सामाजिक समूह वतीने सन्मान करुन पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.
यावेळी दत्ता मोरस्कर सह सरस्वती विद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
