
दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी श्री साईनाथ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन हा कौशल्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमधील विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढीस लागावी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच नवनवीन संकल्पना वाव मिळावा या दृष्टीने संस्थेचे अध्यक्ष श्री योगेश सोमवंशी यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळगांव ग्रुप ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच श्री रामदास इंगळे उपस्थित होते तसेच श्री संत नागाबाबा आश्रमचे महत नागामहाराज यांच्या हस्ते सरस्वतीपुजन व उदघाटन संपन्न झाले. यावेळी नुकताच समाज भूषण पुरस्कार प्राप्त झालेले जन नायक न्यूज चे प्रतिनिधी श्री शशिकांत जगताप यांचा देखिल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला .पोलिस टाईम्स येवला तालुका प्रतिनिधी श्री संतोष गायकवाड धुळगाव चे युवा नेते प्रवीण गायकवाड श्री साईनाथ इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक श्री योगेश सोमवंशी, संचालक श्री हरिभाऊ पवार, विठ्ठल वाळके, भाऊसाहेब गायकवाड ,श्री वाल्मिक शेळके ,श्री मंगेश आहेर, श्री कैलास काकडे यांची उपस्थिती लाभली . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा उद्घाटनाची फीत कापून विज्ञान प्रदर्शनास सुरूवात करण्यात आली विज्ञानाच्या वेगवेगळ्या अशा उत्तम नवनवीन संकल्पना प्रतिकृती उत्तम मॉडेल्स याची निर्मिती करून उत्कृष्ट रीतीने सादरीकरण केले यात एकूण 25 उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुळगाव, कै नारायणराव पवार माध्यमिक विद्यालय धुळगाव या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भेट दिली त्याचप्रमाणे स्कूलच्या विज्ञान विषयाच्या प्राध्यापिका जागृती व्यापारी मॅडम यांचे मार्गदर्शन मुलांना मिळाले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या सौ रुपाली सोमवंशी,प्रा. आव्हाड मॅडम, दिपाली कड , प्रियंका घोरपडे, काळे मॅडम, निकम मॅडम ,ज्योती निकम ,शेळके मॅडम, पंडित मॅडम,योगिता गायकवाड मॅडम, जाधव मॅडम, योगेश खळे सर, प्राध्यापक मुळे मॅडम यांचे सहकार्य लाभले,
