मुंबईत रंगणार दिग्गज सेलिब्रेटी कलावंतांचा क्रिकेट धमाका – मराठी सेलिब्रिटी लीग – 2025

0

मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर भिकाजी तेटांबे)

सेलिब्रिटी म्हंटल की तो कोणत्याही क्षेत्रातील असो अभिनय, नाट्य, संगीत, दिग्दर्शन, तंत्रज्ञ किंवा आणखी तो आपल्या कलेच्या माध्यमातून केवळ रसिक प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न नाही करत तर समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या मनात घर करण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो. दिवसाचे 12-16 तास कॅमेरासमोर आणि प्रकाशाच्या झोतात उभं राहून कला सादर करून रसिक प्रेक्षकांचे मन रिझवण्यासाठी प्रत्येक कलावंत जीवापाड मेहनत करत असतो. ना वेळेवर जेवण ना वेळेवर झोप या गोष्टींपासून तो अलिप्त असतो. तेव्हा अशा सेलिब्रिटी कलावंतांना एक विरंगुळा किंवा त्यांना आत्मिक समाधान मिळावं म्हणून थ्री स्टार मीडिया सोल्युशन लिमिटेड दिनांक 23 मे ते दिनांक 25 मे रोजी मुंबई पोलीस जिमखाना, मरिनलाईन येथे घेऊन येत आहेत मराठी सेलिब्रिटी लीग टूर्नामेंट – 2025. यात प्रसिद्ध नामवंत असे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि त्यांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यात प्रामुख्याने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे, प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक संचित यादव, प्रसिद्ध अभिनेते हरीश दुधाडे, प्रसिद्ध अभिनेते हार्दिक जोशी यांचा सहभाग तसेच यांचे संघ असणार आहे. सीजन बॉलच्या या टुर्नामेंट्सचे आयोजन संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ , विनायक धरगलकर, अजय सूर्यवंशी, सचिन खंडांगळे, रोशनी सावंत, सौरभ राजपुरे, कॅल्विना चॅटर्जी यांनी केले आहे. तेव्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवून आपल्या आवडत्या सेलिब्रिटी कलावंतांना मान देऊन त्यांचा सन्मान वाढवायचा आहे आणि आपणही आनंद लुटायचा आहे असे आवाहन संचित यादव आणि पूर्णिमा वाव्हळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here