येवला : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शासकीय रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले,येवला शहर व तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनेआदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई यशवंतराव आंबेडकर यांचा 90 वा जन्म दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलायावेळी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे मीराताईआंबेडकर यांच्या जन्मदिवसा चा औचित्याने ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना तसेच रुग्णालयात भरती असलेल्या प्रसूत मातेस व गंभीर आजाराच्या रुग्णांना यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व मिठाई वाटप करण्यात आले,यावेळी रुग्णालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत फळ व मिठाई वाटप केल्याने रुग्णालयाच्या वतीने या फळवाटप उपक्रमाचे कौतुक करत ज्या बाबासाहेबांच्या कर्तुत्वाने आज आपण घडलो त्याच बाबासाहेबांच्या सुनबाई चा म्हणजेच मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करणे म्हणजे या फळातून रुग्णांना विटामिन सी, विटामिन बी, असे जीवनसत्व मिळून रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती ही वाढते म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम केला तो कौतुकास्पद असल्याचे यावेळी महिला अधिकाऱ्यांनी सांगितले ,यावेळीभारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव व येवला तालुका अध्यक्ष दिपक गरुड यांच्या उपस्थितीत शासकीय रुग्णालयात फळ व मिठाई वाटप करण्यात आले.प्रसगी उपस्थित भाऊसाहेब आनंदा जाधव जिल्हा अध्यक्ष, दिपक गरुड तालुका अध्यक्ष, डॉ.सोनवणे, रामभाऊ केदारे सरचिटणीस, प्रविण खळे कोष्याध्यष, रवींद्र सोनवणे जिल्हा संघटक, श्रावण गरुड,सखाहारी गरुड, अरुण घोडेराव, भिमराव वाघ, शशीकांत जगताप, अर्जुन डोखे,विजय गायकवाड, अमोल गायकवाड, अजित पानपाटिल, भाऊसाहेब झाल्टे,रवींद्र संसारे, अमोल सोनवणे,बाबुराव पगारे, पंचशीला पानपाटिल,सरला वाघ व रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(संकलन शशिकांत जगताप )