जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घुले बंधुची शेवगाव बाजार समितीत खांदेपालट

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌‌ सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समिती ही राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि नरेंद्र घुले पाटील यांच्या ताब्यात आहे. निवडणुकी नंतर शेवगाव बाजार समितीचे सभापती म्हणून एकनाथ कसाळ तर उपसभापती म्हणून गणेश खंबरे यांची निवड करण्यात आली होती.आता त्यांना घाईघाईने सहायक निबंधकाकडे राजिनामे देण्याचे सांगून पुन्हा एकदा नव्याने सभापती उपसभापतीच्या नवीन निवडी जाहीर केल्या आहेत.सभापती म्हणून शेवगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गदेवाडीचे नानासाहेब मडके यांची तर उपसभापती म्हणून पश्चिम भागातील ढोर जळगाव येथील सौ.रागिनी लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घुले बंधुनी या निवडी जाहीर केल्या आहेत. कोणत्याही परीस्थितीत शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नगर पालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठीचा घुले बंधुनी चंग बांधला आहे. विधानसभेतील पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. विधानसभा निवडणुकीत दुधाने पोळलेले घुले पाटील आता ताक ही जोरात फुंकू लागले आहेत.आणि घुले पाटील परीवार अंग झटकून कामाला लागला आहे. त्यांची सुरुवात शेवगाव बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीच्या नवीन निवडीने झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शेवगावचे सहायक निबंधक विजय लकवाल यांनी काम पाहिले.मतदार संघातील भाजपातील नाराजांची मोट बांधून घुले पाटील पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपलाच झेंडा फडकवतील अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोलली जात आहे. शेवगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून क्षितीज घुले यांनी पाच वर्षे चांगला कारभार केला होता. तर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून सौ राजश्रीताई घुले यांनीही पारदर्शक कारभार केला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बरोबर नगरपालिकेच्या ही निवडणूका होणार असल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी आतापासूनच राजकीय पक्षांकडे सेटींग लावून उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे.सरकारातील सत्ताधारी भाजप,शिंदे सेनेच्या गटात अजून सामसूम दिसत आहे.ते ऐनवेळी आपले पत्ते उघड करून जातीपातीचे कार्ड खेळताना दिसणार आहे.भाजपच्या गोटात तर एकला चलोचा नारा देऊन ऐनवेळी राष्ट्रवादी सेनेला धोबीपछाड देत आपले उमेदवार उभे करणार असल्याचे घाटत आहे. माजी सभापती संजय कोळगे यांचीही आगामी निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. कोळगे हे घुले पाटील यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.शेवगाव तालुक्यात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे.शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समितीतील या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे चेरमन नरेंद्र घुले पाटील यांनी नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here