अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी आधुनिक काळातील शिवाजी संभाजीचा सन्मान सोहळा साजरा केला. व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे विद्यमान चेरमन अप्पासाहेब राजळे आणि माजी चेरमन उद्धवराव वाघ यांचे खंदे समर्थक असलेले शिवाजीराव नेहुल आणि संभाजीराव नेहुल यांचा पंचाहत्तरावा अभिष्ट चिंतन सोहळा जवखेडेदुमाला ता.पाथर्डी येथे आयोजित करण्यात आला होता.या नेहुल परीवारातील एकाच घरात छत्रपती, संभाजी,शिवाजी, शहाजी हे चौघे भाउ जन्माला आले होते.त्या पैकी छत्रपती आणि शहाजी हे दोघे बंधू हे जग सोडून गेले आहेत.परंतू संभाजी आणि शिवाजी यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. शिवाजीराव हे गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून काम करत होते तर संभाजीराव हे शासकीय शाखेत नोकरी करीत होते. सर्व नेहुल कुटुंबातील सदस्यांनी या दोघांचा पंचाहत्तरावा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटात साजरा केला. या सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदाताई वाघ आणि विद्यमान भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांना आमंत्रित करण्यात आले होते.प्रथम सुनंदाताई वाघ आणि आमदार मोनिकाताई राजळे यांनी नेहुल पाटील परीवारातील आधुनिक शिवाजी संभाजी यांचा सपत्नीक सत्कार केला.नंतर नेहुल पाटील परीवाराच्या वतीनेही आमदार मोनिकाताई राजळे यांना सन्मानित करण्यात आले. प्रारंभी शिवाजी संभाजी या दोघांच्या वजनाचे तेल गुळ,गरा, तांदूळ यांच्या सहाय्याने वजनतुला करण्यात आली होती.आणि हा वजन केलेला किराणा माल श्रीक्षेत्र मोहोटादेवी गडावरील अन्नछत्रालयात दान केला होता. छत्रपती संभाजी शिवाजी शहाजी यांचा परीवार फार मोठा आहे.अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आलेल्या आप्तेष्ट, स्वकीय, मित्र यांना प्रीती भोजन देण्यात आले. या सोहळ्यासाठी केदारेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माधवराव काटे,व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ,सरपंच चारूदत वाघ,सचिन नेहुल, विकास नेहुल, प्रविण नेहुल, संतोष नेहुल, प्रमोद नेहुल, प्रशांत नेहुल, अजित नेहुल, आनंद दरंदले, संदिप नेहुल, प्रमोद काकडे, भास्कर नेहुल, वैभव आंधळे, विक्रम नेहुल सर, वसंतराव नेहुल,संपत वांढेकर,राजू औटी, हरीभाऊ हाडके, उत्तमराव आहेर, बाळासाहेब कांडेकर सर,विनायक राजळे, दादासाहेब राजळे, अमोल जाधव,प्रकाश कांबळे, संदिप मरकड इत्यादी मान्यवरासह पंचक्रोशीतील अनेक सुज्ञ मंडळी उपस्थित होती.आलेल्या सर्व मान्यवरांचे संभाजी व शिवाजी नेहुल यांनी क्रुतज्ञ होउन आभार मानले.
Home Breaking News पंचाहत्तरी गाठलेल्या आधुनिक शिवाजी संभाजीचा आमदार मोनिकाताई राजळे आणि सुनंदाताई वाघ यांच्या...