अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शहाजापूर (फलकेवाडी) येथे 11ते18 मे 2025 या कालावधीत ह.भ.प. रामगिरी महाराज येळीकर(येळेश्वर संस्थान येळी) यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व ह.भ.प.शाहु महाराज येवले,उद्धव महाराज जाधव,मंगलताई महाराज वैद्य,अंबादास महाराज क्षिरसागर, गणेश महाराज डोईफोडे,वैष्णवी महाराज यांची प्रवचने तर सर्व ह.भ.प.बाळक्रुष्ण महाराज सुडके, कल्याण महाराज शिंदे,आयुष महाराज कुसळकर,मच्छिंद्र महाराज निकम, ज्ञानेश्वर महाराज तांबे, रामेश्वर महाराज चव्हाण,राम महाराज झिंजुर्के यांची किर्तने होणार आहेत.शनिवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी चार वाजता दिंडी मिरवणूक होणार आहे.रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत ह.भ.प.महंत रामगिरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि लक्ष्मण रघुनाथ फलके यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या गौरवशाली अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहात गायनाचार्य म्हणून ह.भ.प. भागवत महाराज मरकड,संजय महाराज माने , भाऊसाहेब महाराज बडे हे काम पाहणार आहेत.म्रुदुंगाचार्य म्हणून ह.भ.प.शुभम डोईफोडे आणि विठ्ठल डोईफोडे हे काम पाहणार आहेत.हार्मोनियमवर कुंडलीक महाराज शिंदे आणि ज्ञानेश्वर महाराज सोनवणे हे काम पाहणार आहेत.संपुर्ण सप्ताहात पाण्याची व्यवस्था दत्ताशेट उगले हे करणार आहेत.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ शहाजापूर (फलकेवाडी) व सोमेश्वर पुरूष आणि महिला भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.अखंड हरीनाम सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे 4ते5काकडा भजन, 6ते7 विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 10ते12 गाथा भजन, सायंकाळी 4ते5 प्रवचन,5ते6 हरीपाठ, रात्री 9ते11 हरी किर्तन,नंतर हरीजागर या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.या अखंड हरीनाम सप्ताहाचे हे 25 वे वर्षे आहे.