विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती बाळगावी -अनिल पवार

0

सिल्लोड(प्रतिनिधी- विनोद हिंगमिरे) विद्यार्थ्यांनी निसर्गासह,दैनंदिन जीवनात आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचा कार्यकारणभाव शोधत चिकित्सक, ,संशोधक वृत्ती निर्माण करावी.असे आवाहन गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी केले येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेतआयोजित तालुकास्तरीय विज्ञान,गणित पर्यावरण,प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गणेशसिंग गौर हे होते. व्यासपीठावर विषयतज्ञ प्रकाश शिंदे, सुनील हिवाळे, रमेश गिराम, बळीराम गाडेकर,दिपक रंगे, मनोज बोराडे,शामकांत पाचपुते, महेंद्रसिंग पाटील, विवेक पिसे आदींची उपस्थिती होती
यावर्षी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती,पर्यावरणास अनुकूल सामग्री,आमच्यासाठी गणित,आरोग्य व स्वच्छता,वर्तमान नवोक्रमासह ऐतिहासिक विकास,आरोग्य व स्वच्छता, पर्यावरणीय चिंता हे विषय प्रदर्शनासाठी देण्यात आले होते
पुढे बोलताना पवार म्हणाले की,विज्ञान मानवाला मिळालेली सुंदर भेट आहे.विज्ञान म्हणजे सत्याचे शोधन असून, विज्ञानाने मानवी जीवन समृद्ध केले.सकारात्मक दृष्टिकोन बाळगत सद्सद्विवेक बुद्धीने रचनात्मक कार्य विज्ञानाच्या साह्याने केल्यास मानवी जीवन आणखीन सुखावह होईल असे स्पष्ट करीत विद्यार्थ्यांनी घडणाऱ्या घटनांचा कार्यकारणभाव शोधत, संशोधक वृत्ती बाळगावी असे स्पष्ट केले,अध्यक्षीय समारोपात गौर यांनी, पर्यावरणाची विज्ञानाशी आवश्यक असलेली सांगड याचे महत्त्व स्पष्ट करीत बालवैज्ञानिकानी। त्या त्यादृष्टीकोणातून संशोधन करण्याची आज खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रदर्शनात नववी ते बारावी गटातून 26 शाळांची तर सहावी ते आठवी गटातून 39 शाळांची नोंदणी झालेली होती शिक्षक साहित्य गटात 7 जणांची तर प्रयोगशाळा परिचर गटातून एक साहित्याची नोंदणी झालेली होती,विज्ञान प्रदर्शनाचा निकाल खालीलप्रमाणे सहावी ते आठवी गट -–———————– प्रथम- होलिफेथ इंग्लिश स्कुल भराडी(आरोग्य स्वच्छता) द्वितीय- मुरडेश्वर हायस्कूल,लिहाखेडी
(सोलार ट्री) तृतीय- स भु प्रशाला भराडी(आरोग्य स्वच्छता) —————————— नववी ते बारावी गट ————————- प्रथम-नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल अजिंठा (पर्यावरण)
द्वितीय- सहकार महर्षी माणिकराव पालोदकर हायस्कूल पालोद(आरोग्यस्वच्छता
तृतीय- ज्ञानविकास माध्यमिक विद्यालय भराडी(घाटमाथाची सुरक्षा) ————————— प्राथमिक शिक्षक गट
—————————- १) प्रथम-विठ्ठल पुरी(प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा) (गणितीय खेळ)
—————————— माध्यमिक शिक्षक गट
—————————– प्रथम-रजा खान (संत कबीर विद्यालय रेलगाव) (प्रकाश परावर्तन)
—————————– प्रयोगशाळा परिचर गट
—————————— शिवनारायण गौर(स भु प्रशाला भराडी) (टाकाऊ पासून टिकाऊ)
—————————— परीक्षक म्हणून नरेंद्र साळवे,गणेश व्यवहारे,नितीन ढोरमारे यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रशांत अपसिंगेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोज डोलारे यांनी मानले प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ,——————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here