महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला,आमदारकीची निवडणूक लढविणाऱ्यांची पळताभुई थोडी झाली,

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” अहमदनगर जिल्हा) देशातील लोकसभा निवडणुकीचा धुराळा शांत होउन सरकार स्थापन होते न होते तोच आता पुन्हा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असुन विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सांभाव्य उमेदवारांची मात्र पळताभुई थोडी झाली आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तुतारी वाजली असल्याचे व्रुत्त आजतक या व्रुत्त वाहीणीने प्रसिद्ध केले आहे.विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळव करून उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांची अचानक झालेल्या घोषणेणे चांगलीच झोप उडाली आहे.महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची निवडणुक एकाच दिवशी होणार आहे.२० सप्टेंबर रोजी निवडणूकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज २७ सप्टेंबर पासून भरण्यास सुरुवात होणार आहे.प्रत्यक्ष मतदान हे १५ आँक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी १९ आँक्टोबर रोजी होणार आहे.आणि २१ पर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. कारण मागील निवडणूक ही २१ आँक्टोबर २०१९ रोजी घेण्यात आलेली होती. कदाचित निवडणूक आयोग लोकसभेप्रमाणे या जाहीर केलेल्या तारखामधे काही दिवसाचा फेरबदलही करु शकतो. होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना मात्र आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. निवडणूकीतील राजकीय पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांना चांगलीच दमछाक करावी लागणार आहे. जिल्ह्यातील काही नेते राजकीय पक्षाने तिकिट नाकारल्यास एकला चलोरे करत अपक्ष उमेदवारी करण्यासाठी रणनीतीची आखणी करीत आहेत. तर जिल्ह्यातील काही आमदार हे पंधरा आँक्टोबर पर्यंतच आमदार राहणार आहेत त्यांनी मात्र आतापासूनच हातावर दिवस मोजण्यासाठी सुरुवात केली आहे.अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात उलथापालथ होणार आहे. अनेक मतदार संघात आमदार म्हणून नवीन चेहरे उदयास येणार आहेत.निवडणूकीची ही सांभाव्य तारीख आहे.निवडणूक आयोग या तारखेत कदाचित फेरबदलही करू शकतो. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी दगाफटका केला त्यांना जवळपास त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे. अनेक पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या उमेदवाऱ्या कापण्यासाठी काटाकाटी, शहकाटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील “सोधापक्ष” मात्र नेमक्या कोणत्या सोयऱ्या धायऱ्याला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळते याकडे लक्ष ठेऊन आहे. निवडणूकीच्या व्रुताने अनेकांची तारांबळ उडाली आहे. काहींना कामाची बीले मिळणण्याची प्रतिक्षा लागली आहे.तर काहींना राहीलेला निधी विकास कामासाठी उडवण्याची घाई झालेली आहे. निवडणूकीत उमेदवारी मिळवण्याच्या रणधुमाळीला आता वेग आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here