
मुंबई : आता थोडे असे जगू या
महापुरुषांना मोकळे सोडू या
ते साधतील संवाद….
तेव्हाच त्यांच्याशी बोलू या!
‘ते’ आपले कुणीही लागत नाहीत
जन्मदात्यांशी आपण नीट वागत नाही
डोकी फोडून घेतो, वृथा अभिमान
महापुरुषांना बदनामीतूनही सोडत नाही
सूर्याच्या दिशेने कुणी थुंकलाच जर…
सूर्याला काही फरक पडत नाही
सगळीकडील दळभद्री राजकारण पाहून
महात्म्यांची चिरशांती जराही ढळत नाही
वाचाळ माजलेत फार, सत्तेचाही घमंड
महापुरुषांना धरले ‘धंद्या’साठी वेठीस
मीडियाने घेतले त्यांनाच डोईवरी
उद्या पत्रकारांना ‘हेच’ देतील गळफास!
मिटल्या डोळ्यांनी आसवं गाळत
महापुरुष पुन्हा लढतील, स्वकीयांशी!
मुंडके छाटू, जीभही कापू वाचाळांची
असे लढू या आता निर्धाराने घरभेद्यांशी!
– कांतीलाल कडू
