
मनमाड : मनमाड शहर पत्रकार संघ व नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन हा आगळावेगळा पद्धतीने साजरा करण्यात आला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सर्व पत्रकारांनी जाऊन अभिवादन केले दर सहा जानेवारीला पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा एक आगळावेगळा निर्णय पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आला कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय संविधानामुळेच पत्रकारिता ही स्वतंत्रपणे आपले मत मांडू शकते
आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य असणाऱ्या समस्यांना न्याय देऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच ते शक्य आहे सहा जानेवारी पत्रकार दिन सादर करत असताना या दोन्ही महामानवांची आठवण ठेवून ही गरजेचे आहे असा आगळावेगळा ठराव मनमाड शहर पत्रकार संघ व नांदगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला यावेळेस जेष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड संजीव निकम नरेश भाई गुजराती बब्बू भाई शेख तसेच मनमाड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र पगार यांच्यासह विनोद वर्मा, अविनाश पारखे, बाळासाहेब अहिरे राजेंद्र, तळेकर सतीश परदेशी,हिरामण मनोहर क्रांती आव्हाड,जगदीश आडसुळे हर्षद गद्रे सागर भावसार अमोल बनसोडे अजहर शेख अमीन कदीर शेख संतोष खताळ,रईस शेख,गणेश देशमुख, सुरेश शेळके सचिन बैरागी किरण काळे नाना विसपुते हेमराज वाघ सिताराम पीगळे आदी उपस्थित होते,
