आम्ही नाराज आहोत,पण आता ती व्यक्त करण्याची वेळ नाहीये.तुम्हाला इतर विधानसभा मतदार संघापेक्षा सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करू

0

नांदगाव :आम्ही नाराज आहोत,पण आता ती व्यक्त करण्याची वेळ नाहीये.तुम्हाला इतर विधानसभा मतदार संघापेक्षा सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करू ; अन मग त्यानंतर आमची नाराजी बोलून दाखवू असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी भाजपच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांना उद्देशून केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी,मनसे,रासप,रिपाई या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा एकत्रित स्नेहमेळावा आमदारांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे,उमेदवार डॉ.भारती पवार,माजी आमदार राजेंद्र देशमुख,माजी आमदार संजय पवार,भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,राजेंद्र पवार,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे,तालुक्यातील महिलांचे खंबीर नेतृत्व सौ.अंजुम कांदे,नितीन पांडे,सभापती अर्जुन पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे,आनंद कासलीवाल,दत्तराज छाजेड,पंकज खताळ, मयूर बोरसे,आदी उपस्थित होते.आ.कांदे पुढे म्हणाले की,आज आपण नाराजी दर्शवली तर याचा फायदा विरोधकांना होऊन ते नगरपालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या वरचढ होण्याची शक्यता जास्त आहे,म्हणून सध्या ही नाराजी दूर ठेवून एकदिलाने,एकमताने आणि एक विचाराने एक होऊन भारती ताईंना गेल्या वेळेपेक्षा सर्वाधिक मताधिक्य आपल्या मतदार संघातून मिळवून देऊ,अन त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी बसवू अन मग आपली नाराजी त्यांना सांगू.! असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
यावेळी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी बोलताना केंद्र शासनाकडून कांदा,कपाशी,द्राक्ष आदी पिकांबाबत दुर्लक्ष झाल्याची बाब अधोरेखित करत भविष्यातील निवडणुका लक्षात घेऊन भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.माजी आ.संजय पवार यांनी ही जुन्या गोष्टीना उजाळा देत मी पक्ष बदलले नाही,तर मला भाग पाडण्यात आले असे सांगितले.
,राजेंद्र देशमुख,शिवसेनेचे सुनील पाटील,राजेश कवडे,दत्तराज छाजेड,सौ.अंजुम कांदे,महावीर पारख,आदी वक्त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.भाजपच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांनी वरील गोष्टी घडल्या असल्या तरी यातून काही चांगल्या गोष्टी ही घडल्या असल्याचे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.यावरून राजकारण करणारे विरोध पक्ष दूटपी असल्याचे त्या म्हणाल्या.या भव्य स्नेह मेळाव्यास माजी नगराध्यक्ष बबलू पाटील,माजी सभापती तेज कवडे,किशोर लहाने,डॉ.संजय सांगळे, संग्राम बच्छाव ,महेंद्र दुकळे,दिपक मोरे,श्रद्धा जोशी,नंदू पाटील,रमेश पगार,अण्णासाहेब पगार,प्रकाश घुगे,देविदास मोरे,गंगादादा त्रिभुवन,प्रदीप थोरात,आदिंसह शिवसेना,युवासेना,महिलाआघाडी,भाजप,राष्ट्रवादी,रिपाई,रासप,मनसे,आदी पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी,विविध गावांचे सरपंच,सदस्य,सोसायटी संचालक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here