अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न .

0

मुंबई : आग्रीपाडा (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत हनुमान सेवा मंडळ यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील ५२ वे मोफत आरोग्य शिबीर नुकतेच आग्रीं पाडा, मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. ह्या शिबिरास कुलाबा विधानसभा अध्यक्ष श्री विकास मयेकर ,माजी नगरसेविका सौ.विशाखा पेडणेकर, सिने नाट्य दिग्दर्शक पत्रकार श्री. महेश्वर तेटांबे, मुंबई समन्वयक महिला सौ.वसुधा वाळुंज, शिबिरासाठी पुढाकार घेणारे समाजसेवक श्री. राजाराम झगडे, श्री.साईनाथ वंजारे , युनिकेअर हेल्थ सेंटर चे श्री .रमेश कांबळे , ह्यांनी तसेच स्थानिक मान्यवरांनी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली ह्या सर्वाचे तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ह्याचे शिबिराचे उत्कृष्टपणे नियोजन केल्याबद्दल अक्षरा संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल वंजारे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here