नो लंके, ओन्ली विखे” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चे अहमदनगरच्या सभेत इंडिया आघाडीवर जोरदार टिकास्त्र!

0

अहमदनगर : (सुनिल नजन”चिफ ब्युरो”/अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) ‌अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाने जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आवर्जून उपस्थित होते.शहरातील दिल्ली गेट परिसरात झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडत सभा गाजवली.आणि ” नो लंके ओन्ली विखे” ची घोषणा करून खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की एनडीए सरकारचा चारसौ पारचा नारा आहे त्या चारसौ पार मध्ये सुजय विखे हे पहील्या रांगेत दिसण्यासाठी कमळाच्या चिन्हावर बटन दाबून विखेंना निवडून देण्याचे आवाहन केले.या जाहीर सभेस आमदार राम शिंदे,अभय आगरकर, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, अरूण जगताप,आमदार संग्राम जगताप, विक्रम पाचपुते यांच्या सह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील महायुतीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अहमदनगर शहरातील सर्व रस्ते लोकांच्या गर्दीने हाऊस फुल्ल झाले होते.करंजी घाटात तिनं तास वाहनांच्या रांगा लागल्या मुळे वाहतूक व्यवस्था पुर्णपणे कोलमडली होती. नंतर पोलीसांनी सुरळीत केली.सुजय विखे यांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनाने विरोधी महाविकास आघाडीने ही तोडीसतोड उत्तर देऊन “हम किसी से कम नहीं”हे शरदपवार यांच्या सभेने दाखवून दिले आहे.आता निवडणूकीचे अर्ज दाखल करताना जोरदार शक्ति प्रदर्शनामुळे निवडणुकीत खरा रंग भरू लागला आहे.कडक उन्हातही सर्व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.दोन्ही गटाच्या जाहीर सभेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्हा निवडणूकमय झाला आहे. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सरकारी अधिकारी डोळ्यात तेल घालून पहारा करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here