माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे.

0

नांदगाव : विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी आज नगरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा मातेची यात्रा निमित्त साधून आरती केली व मनोभावे दर्शन घेतले.व यंदा मतदार संघात चांगला पाऊस पडू दे,व माझ्या शेतकऱ्यांच्या पदरात जो दृष्काळ टाकला होता,त्याची भरपाई करून दे असे देवी मातेला साकडे घातले.आमदार श्री.कांदे यांच्या सोबत यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश (बबी) काका कवडे,माजी सभापती विलास आहेर,उद्योजक आनंद कासलीवाल,बाजार समिती संचालक अमोल नावंदर,मजूर संस्थेचे संचालक प्रमोद भाबड,युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे, शहरप्रमुख सुनील जाधव,नंदू पाटील, पिंटू कासार, संदीप आहेर, संभाजी पाटील, मुन्ना शर्मा सर, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here