मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)
आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सुरेंद्र गावसकर हॉल, दुसरा मजला, नायगांव, दादर (पूर्व) येथे सिने-नाट्य क्षेत्रांतील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि कुटुंब रंगलंय काव्यात चे सादरकर्ते प्रा.विसुभाऊ बापट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री गणेश, श्री नटराज आणि शिवप्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. आर्यारवी एंटरटेनमेंट चे महेश्वर तेटांबे यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. लघुपट महोत्सव आयोजीत करणे आणि ते यशस्वी करून दाखवणे हे खुप मोठं जिकरीचे काम असुन महेश्वर तेटांबे आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करतो आह़े हे विशेष आह़े असे मत विजय पाटकर यांनी मांडले. विसुभाऊ बापट यांनी आपल्या भाषणातून लघुपट महोत्सवात दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या महनीय व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून महेश्वर तेटांबे यांनी एक अलौकिकता प्राप्त केली आह़े असे मत मांडले. त्याचबरोबर प्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या काव्यमय शैलीत जय जय महाराष्ट्र माझा हे अजरामर गीत आणि उंच माझा झोका हे काव्य गाऊन रसिक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, गीता कुडाळकर, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अनिल सुतार, प्रसिद्ध वादक, अभिनेते डॉ.किशोर खुशाले, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, समाजसेवक एन.डी.खान, प्रसिद्ध समाजसेवक, अभिनेते खलील शिरगांवकर, फिल्म क्राफ्ट फेडरेशन चे सरचिटणीस दिलीप दळवी, आपलं नवे शहर या दैनिकाचे उपसंपादक राजेंद्र घरत, समाजसेवक संजय सावंत, मदन भाऊ डापसे, अँड सुनिल शिर्के (शिर्के फौंडेशन) आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण, कलाभूषण, रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयोजक अनंत सुतार यांनी लघुपट स्पर्धेचा निकाल जाहीर केला या निकालात दिपक पवार यांच्या “चोरी” (प्रथम विजेता) रोख रक्कम 25 हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, सुहास कर्णेकर यांच्या “पनाह” (द्वितीय विजेता) रोख रक्कम 15 हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, श्रवण दंडवते यांच्या “पिरॅमिड” (तृतीय विजेता) रोख रक्कम 10 हजार,सन्मानपत्र
आणि सन्मानचिन्ह, दत्तात्रय तिटकारे यांच्या “वणवा” (उत्तेजनार्थ विजेता) रोख रक्कम 5 हजार,सन्मानपत्र
आणि सन्मानचिन्ह आणि आनंद खाडे यांच्या “बाप” (विशेष परीक्षक विजेता) रोख रक्कम 2500/- सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर सिनेसृष्टीत अलौकिक कार्य करणाऱ्या श्री सत्यवान तेटांबे, रमेश साळगांवकर, हरिश्चंद्र भंडारे, आणि अचला पांचाळ यांना प्रसिद्ध ज्येष्ठ कवी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध निवेदक विलास (बाळा) चौकेकर यांनी आपल्या निखळ वाणीने करून रसिकांची वाहवा मिळवली तर या सोहळ्यासाठी प्रसिद्ध समाजसेवक आणि ग्राफिक डिझायनर मनिष व्हटकर यांनी विशेष मेहनत घेऊन आपलं मोलाचं योगदान दिले. अभिनेता सुरेश डाळे आणि अभिनेत्री लक्ष्मी मनिष गुप्ता यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. शिरोडकर हायस्कूल 1988 दुपार अधिवेशन च्या मित्रपरिवार यांनी (देवेंद्र पेडणेकर, सुरेश गुरव आणि संदिप चव्हाण) यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली. हा दुसरा लघुपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी रवी मोरे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मॅनेजर अनिकेत गावडे, अभिनेत्री प्रणाली निमजे, सुनिल पाटेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत सुतार, सिनेरामा प्रॉडक्शन चे राम माळी, तेजस माळी, कवी विलास देवळेकर, शशिकांत सावंत, किशोर चौकेकर, दिग्दर्शक गणेश तळेकर, गणेश नर, दिलीप शेडगे, दत्ता खंदारे यांनी सहकार्य केले. आणि जन गण मनं या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.