प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) आज दिनांक 3जानेवारी 2023वार मंगळवार रोजी प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथे सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती कोकीळाबाई मोरे सरपंच होते तर प्रमुख अतिथी मार्गदर्शक श्रीमती जयवंताबाई पवार मॅडम सेवानिवृत्त शिक्षीका , श्रीमती एम डी काकडे मॅडम आरोग्य सेविका.प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विमल लोखंडे उपसरपंच,एम एच श्रीराम वार मॅडम आरोग्य सेविका , तसेच आरोग्य विभागातील आर जे राठोड मॅडम मगरूळे सिस्टर निकम मावशी कोल्हे मावशी उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने सर्व कर्तृत्ववान महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांची वेशभूषा केलेलीं होती त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत गीत भाषण यातुन सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर काकडे मॅडम यांनी आज ज्या महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत यांचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते सावित्रीबाई फुले यांना जाते तसेच आजच्या महिला व मातांना सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.तसेच मुली शिकल्या तर दोन्ही कुळाचा उध्दार होतो तीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी हे पवार मॅडम यांनी स्पष्ट केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कुशल देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कैलास रिंढे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विठ्ठल पुरी सर यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक श्री सुरेश कुरकुटे सर विकास पगार सर रामेश्वर सहाणे सर योगेश देशमुख सर सुलोचना राठोड मॅडम वैशाली ब्राम्हणे मॅडम रामेश्वर गरूड सर समाधान वाघमोडे सर गजानन पिसे सर व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here