सिल्लोड ( प्रतिनिधी – विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील तळणी गावात एक खाजगी डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे.सदर डॉक्टर यांना लागण कशी झाली आहे हे मात्र अजून उघडकीस आलेले नाही. सदर रुग्णाच्या परिसरातील सर्व एरिया स्थानिक प्रशासनाच्या वतिने सिल करण्यात आला असुन विशेष खबरदारी म्हणुन त्यांच्या कुटुंबाचे व त्यांच्या संपर्कातील काही जणांचे स्वॅब तपासणी घेण्यात आले सुदैवाने ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य अधिकारी कुणाल चौधरी यांनी गावात भेट देऊन ग्रामपंचायत पदाधिकारयांना परिसर सिल करून डॉक्टर यांच्या संपर्कात आलेल्या सर्व गावातील पेशंट तथा नागरिक यांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे
व सदर डॉक्टर यांच्या संपर्कात असलेले नागरिकांची यादी मिळताच गावात करोना चाचणी चा कॅम्प घेण्यात येईल व गावातील सर्व नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी अशी माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.