जामनेर /प्रतिनिधी
सध्या चालु असलेल्या लॉकडावूनमुळे असंघटीत कामगारांची आर्थीक बाबतीत दयनिय अवस्था झाली आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालविण्यासारा समाज आधीपासूनच आपलाप्रपंच मजूरीकरुन भागवतो आहे त्यात आता या महामारीमुळे संपुर्ण व्यवसाय व मजुरी बंद आहे.
अशा परिस्थितीत त्याने आपली उपजीविका तरी कशी भागवावी ! अशावेळी त्याला आपल्या शासनाच्या मदतीची गरज आहे म्हणून आपण ग्रामस्तरावर सर्वेक्षण करून नोदणी नसणारे कामगारांना आपल्या शासनाकडून अंसघटीत कामगारांना सात हजार रु.आर्थिक मदत द्यावी ! मदतीची अत्यंत गरज आहे आणि ती गरज आपण पुर्ण कराल अशी अपेक्षा करतो.सरकार कडून करतो अशी मागणी युवासेना मविसे चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोज दिलीप बाविस्कर यांनी केली आहे.