जामनेरच्या शिक्षण संस्थेकडून मुख्याध्यापकांना विचार परीक्षेविना फी वसुली

0

जामनेर /प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे शासनाने कोणत्याही वर्गाची परीक्षा न घेण्याचे व परीक्षाा फी न घेण्याचे आदेश असतांनाही येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकांनी सुमारे 5 ते 6 लाख परीक्षा फी घेतल्याबाबतचे पत्र सचिवांनी मुख्याध्यापकांना दिले आहे.
फीची रक्कम किती जमा केली व रक्कम कुणाजवळ आहे. त्याच्या पावत्या फाडल्या आहे काय? अशी विचारणा करणारे पत्र जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश धारीवाल यांनी मुख्याध्यापकांना पाठविले आहे.
यंदा परीक्षा नसल्यामुळे वसू केलेली रक्कम बँकेत भरून पुढील वर्षासाठी ती विद्यार्थ्यांकडून न आकारात उपयोगात आणावी, असेही पत्रात नमूद केले आहे.
शासन निर्णयानंतर फी वसुली नाही
कोणत्याही वर्ग शिक्षकांनी व कर्मचारी किंवा मी शालेय विभागाचा परीक्षा रद्द संदर्भात निर्णय झाल्यावर पालकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून कोणतीही परीक्षा फी जमा केलेली नाही. या आधीच वर्गशिक्षकांकडे जमा असलेली परीक्षा फी लॉकडाऊनमुळे ती कार्यालयात जमा करता आली नाही. त्यामुळे आता निकाल तयार करण्यासाठी येत असलेले वर्गशिक्षक त्यांच्याकडे आधीच जमा असलेली फी आता कार्यालयात जमा करीत आहे.
बी.आर.चौधरी
मुख्याध्यापक,
न्यू. इंग्लिश स्कूल,जामनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here