नाशिक-जळगाव शहरातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर नोंदणी कृत सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या नाशिक शाखेच्या वतीने राज्यस्तरीय सूर्योदय कथा _ काव्य भूषण पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी जाहीर केलेले आहेत.
सूर्योदय कथाभूषण पुरस्कार विभागून जालना येथील डाॅ प्रभाकर शेळके यांच्या व्यवस्थेचा बइल या कथासंग्रहाला, नाशिक येथील शरद पुराणिक यांच्या मंगळदेवाची कहाणी या विज्ञानकथासंग्रहाला, पुणे येथील अर्चना दहिवदकर यांच्या शेवटी मी स्त्री या कथासंग्रहाला ,मुंबई येथील सलमा यांच्या माझे मन या कथासंग्रहाला प्रत्येकी रूपये पाच हजार दोनशे पन्नास रूपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार विभागून मालेगाव जि नाशिक येथील कवयित्री शोभा बडवे यांच्या ” अंतःस्वर ” या काव्यसंग्रहाला, माळेवाडी जि. सोलापूर येथील गणेश गोडसे यांच्या” पाणी घातल्या झाडाची पानगळ ” या काव्यसंग्रहाला,इंदोर येथील स्मिता जयस्वाल यांच्या ” माझे निशब्द काव्य” या काव्यसंग्रहाला, मुंबई येथील संतोष मेटकर यांच्या ” गाणी पाऊस अक्षराची ” या काव्यसंग्रहाला प्रत्येकी रूपये दोन हजार सातशे पन्नास रूपये ,गौरवपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
परीक्षक म्हणून प्रा .डाॅ ,उषा सावंत, सौ, माया दिलीप धुप्पड यांनी काम पाहिले . पुरस्कार प्रदान सोहळा २०२१ मध्ये होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.