
जामनेर ( प्रतिनिधी ) देशात कोविड 19 ने दिवसागणिक अनेक नागरिक संक्रमित होत आहे त्यावर आज तरी कोणतेही प्रभावी औषध निघालेले नाही. परंतु या आजाराच्या संक्रमणापासून प्रतिबंधात्मक म्हणून सरकारने प्रत्येक नागरिकाला मास्क गरजेचे केले आहे तर हात sanetraies करण्याचे सुचविले आहे. तर या कोविड 19 मधे पोलीस, सफाई कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी, महसूल कर्मचारी, पत्रकार, आरोग्य कर्मचारी हे कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहे म्हणूनच ग्रामीण कुटा फायनान्स ने सामाजिक बांधिलकी म्हणून संपूर्ण देशात ज्या ठिकाणी कंपनी ची शाखा आहे त्या ठिकाणच्या कोरोना योद्धा यांना मास्क व sanetraieis वाटप करीत आहे त्याचाच 1 भाग म्हणून जामनेर शाखेकडून आज नगरपरिषद परिषद कार्यालय, पोलीस स्टेशन, पत्रकार यांना मास्क व sanetraies चे वाटप करण्यात आले तर तहसील कार्यालयात थर्मामीटर चे वाटप करण्यात आले. यावेळी नगर परिषद चे मुख्याधिकारी राहुल पाटिल, तहसीलदार अरुण शेवाळे, ए. पी. आय सुंदरडे, पत्रकार प्रदीप गायके यांचेसह कंपनी चे एरिया मॅनेजर अर्जुन नरवाडे, जामनेर शाखाधिकारी दिनेश जाधव, गौतम जाधव तसेच कंपनी चे कर्मचारी पवन वीर, शुभम शिंदे, उपस्थित होते.कंपनी च्या संपूर्ण देशात दिड हजारच्या वर शाखा असून मुख्य कार्यालय बंगलोर येथे असून कंपनी कडून पुर्ण देशात पाच कोटी रुपयाचे कोरोना किट वाटप केल्याचे एरिया मॅनेजर अर्जुन सुरवाडे यांनी सांगितले
