कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात 16 हजार 324 शेतकऱ्यांना करण्यात आला 6056 मे. टन खते व 1220 क्विंटल बीयाणांचा बांधावर पुरवठा • 1025 शेतकरी गटांमार्फत 28545 कापुस बियाण्याच्या पाकीटांचाही करण्यात आला पुरवठा

0

जळगाव, दि. 26 – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात 16 हजार 324 शेतकऱ्यांना 1025 शेतकरी गटांमार्फत 6056 मे. टन खते, 1220 क्विंटल बीयाणे, 28 हजार 545 कापुस बियाण्याच्या पाकीटांचाही बांधावर पुरवठा करण्यात आल्याची माहिती कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर कोरोनाचा फैलाव होऊ नये. याकरीता कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या कालावधीत खते, बियाणे व किटकनाशके या निविष्ठा खरेदी करतांना अडचणी येऊ नये. याकरीता जिल्हाभर बांधावर कृषि निविष्ठा पुरविणे बाबत मोहिम राबविण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळातच खरीप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा मिळविण्यासाठी अडचण येऊ नये, तसेच शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर जाऊन बियाणे, खते व किटकनाशके खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते. त्याचबरोबर सोशल डिस्टंसींग न पाळले गेल्यास कोरोना विषाणुंचा फैलाव मोठया प्रमाणावर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांनी यावर्षी शेतकऱ्यांना बांधावर बीयाणे व खते पोहोचविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी कृषिमंत्र्यांच्या आवाहनानुसार नियोजन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी व तालुक्यातील कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी हे ग्रामपातळीवर शेतकरी गट व कृषि सेवा केंद्र यांचे समन्वयक म्हणुन काम करीत आहे.
शेतकरी गटांमार्फत निविष्ठा खरेदी केल्यास एकाच वेळेस जास्त निविष्ठा खरेदी केल्याने वाहतुक खर्च कमी होऊन वेळ व पैश्याची बचत तर होतेच शिवाय गुणवत्तापुर्वक व दर्जेदार निविष्ठा मिळतात. यामध्ये विशेषबाब म्हणून जमीन आरोग्य पत्रिकेवर आधारीत रासायनिक खतांचा संतुलीत मात्रा कृषि सहाय्यकांमार्फत काढुन देण्यात येत असुन त्यानुसारच योग्य त्या खताची मात्रा निश्चित करुन सरळ घाऊक विक्रेता ते शेतकरी /गटांद्वारा जोडणी करुन घेऊन वेळ व पैसे देखील वाचविण्यात येत आहे. शिवाय अनावश्यक रासायनिक खतांची मात्रा दिली जात नसल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वाचत आहे. कापुस बियाण्यांच्या बाबतीत ‘एक गट – एक वाण’ मुळे एकाच कालावधीत पीक निघाल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनी करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना गटांमार्फत कृषि निविष्ठांची खरेदी करण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्री यांचे आवाहनास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्या. कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांच्या समन्वयाने आजपर्यंत जिल्ह्यात 1 हजार 25 शेतकरी गटांमार्फत 6 हजार 56 मे.टन खते, 1 हजार 220 क्विंटल बीयाणे तर 28 हजार 545 कापुस बियाण्याची पाकीटे जिल्ह्यातील 16 हजार 324 शेतकऱ्यांना बांधावर पुरवठा करण्यात आली आहे.
या मोहिमेमुळे कृषि सेवा केंद्रांवरील गर्दी बऱ्याच प्रमाणात टाळल्यामुळे शेतकऱ्यांची फिरफीरही कमी झाली. तसेच संचारबंदी कालावधीत कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली असुन शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचला आहे. या मोहिमेचा लाभ घेतलेल्या शेतकरी व शेतकरी गट यांचेमध्ये शासनाच्या या उपक्रमाबाबत समाधानाची भावना दिसून येत असल्याचे अनिल भोकरे, कृषि उपसंचालक यांनी कळविले आहे.
*तालुका निहाय शेतकऱ्यांना बांधावर खते/बियाणे पुरवठा मोहिमेचा अहवाल*
अ.क्र. तालुका बांधावर पुरवठा खते बियाणे कापुस बियाणे पुरवठा करण्यात आलेले मे.टन क्विंटल पाकीटे संख्या करण्यात
शेतकरी गट संख्या आलेले
शेतकरी
संख्या
1 जळगांव 34 123.40 23.40 733 516
2 भुसावळ 76 230.72 89.25 1120 995
3 बोदवड 102 452.10 153.48 1519 1342
4 यावल 100 458.33 71.74 2755 1098
5 रावेर 206 1766.00 594.35 8373 4070
6 मुक्ताईनगर 28 104.45 47.60 674 355
जळगांव उपविभाग एकुण 535 3087.20 947.62 14890 8213
7 पाचोरा 46 337.78 12.80 847 674
8 भडगांव 46 206.65 36.20 2318 1566
9 जामनेर 42 835.00 44.40 1324 892
10 चाळीसगांव 66 361.70 41.91 1690 1402
पाचोरा उपविभाग एकुण 200 1741.13 135.31 6179 4534
11 अमळनेर 37 291.55 23.30 548 500
12 चोपडा 57 191.36 12.40 1984 1036
13 पारोळा 39 135.95 23.40 1237 476
14 एरंडोल 118 328.00 45.50 2459 1122
15 धरणगांव 39 280.75 32.60 1248 443
अमळनेर उपविभाग एकुण 290 1227.61 137.20 7476 3577

एकुण जळगांव जिल्हा 1025 6055.94 1220.14 28545 16324

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here