अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो ” अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे आणि राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सौभाग्यवती अलकाताई कर्डीले यांच्या उपस्थितीत व महिलांच्या हाऊसफुल्ल गर्दीत हळदी कुंकू समारंभात पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला. करंजी गणातील नेते एकनाथराव आटकर आणि चिचोंडीचे सरपंच श्रीकांत आटकर यांनी आठ वर्षांपासून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा उपक्रम राबविण्याचा मान मिळवून मीरी जिल्हा परिषद गटात विकास कामांची घौडदौड सुरू केली आहे. उपस्थित सर्व पत्रकारांना सन्मानित केल्यानंतर आलेल्या सर्व महिलांना जेवणाचे डबे “संक्रांतीचे वाण” म्हणून भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वच महिलांना प्रिती भोजन देऊन असेच सदैव मतरुपी आशिर्वाद आमच्या पाठीशी राहुद्या असं सांगितलं गेलं.आमदार सौभाग्यवती अलकाताई कर्डीले यांनी उखाण्यातुन आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव घेऊन उपस्थित महीलांची मन जिंकून घेतली. आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले की शेवगाव-पाथर्डीच्या लाडक्या बहिणीमुळे तिसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि कर्डीले साहेबांना सहाव्यांदा संधी मिळाली आहे म्हणून सर्व माता भगिनींची मी आभारी आहे. असेच सदैव मतरुपी आशिर्वाद आमच्या पाठीशी राहुद्या असं सांगून आमदारांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांना मोठ्या रकमेची बक्षिसे देउन सन्मानित करण्यात आले.कर्तव्यदक्ष नेते एकनाथराव आटकर म्हणाले की मला माजी आमदार स्व.राजीव राजळे यांनी राजकारणात आणले. मंत्रालयातील कामात जास्त मदत मिळवून दिली. बाविस वर्षापुर्वी राजाभाऊंनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो आज पर्यंत मी सार्थ करून दाखविला आहे.आमदार राजळे या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष असताना मीरी करंजीतील गटातील ३९ गावात चांगली कामं केली तेव्हा पासून आजपर्यंत माझा चांगला जनसंपर्क आहे. मला कोणताही राजकीय वारसा नसताना मला करंजी गणात तिकीट दिले आणि लोकांनी मला निवडून दिले.तेव्हा पासून राजकारणात मी राजळे -कर्डीले घराण्यामुळे गेली वीस वर्षे यशस्वी झालो आहे. या कार्यक्रमासाठी पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे हे आवर्जून उपस्थित होते. तसेच चिचोंडीचे सरपंच श्रीकांत आटकर यांनी योग्य नियोजन केले होते.यावेळी सौ अनिताताई एकनाथ आटकर,उषाताई लबडे, ज्योती घोरपडे,यांच्या सह मीरी करंजी गणातील असंख्य महिला मंडळाच्या माध्यमातून अनेक महिला उपस्थित होत्या. अनेक महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील गाण्यांचा आस्वाद घेतला.
Home Breaking News आमदार राजळे आणि आमदार सौभाग्यवती अलकाताई कर्डीले यांच्या हस्ते चिचोंडीत हाऊसफुल्ल गर्दीत...