जामनेर शहर शिवसैनिकांनी राजगड येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आढावा बैठक

0

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे राजगडावर जामनेर शहर प्रमुख पवन माळी व शिवसेना कार्यकर्त्यांनी उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांची भेट घेतली त्यावेळेस कार्यकर्त्यांना रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी व्यायाम व प्राणायाम करावा तसेच कोरोना वायरस ला घाबरून न जाता व लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करा असे मार्गदर्शन केले व जामनेर येथे तालुका शिवसेना कार्यालय उभारण्यात यावे याविषयी चर्चा करण्यात आली व कार्यकर्त्यांना पुढच्या कामाविषयी मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी उपस्थित युवासेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर विश्वजीत राजे पाटील जामनेर शहर प्रमुख पवन माळी व उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे शाखा प्रमुख दिपक माळी वाकी रोड शाखा प्रमुख सुनील गायकवाड फिल्मी ॲक्टर अतुल दबंग शिवा भाई व झाल्टे आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here