लोहाऱ्यातील त्या बोगस डॉक्टर वर कार्यवाई स विलंब, होत असल्याने जामनेर तालुक्यात रोटवद येथे बस्तान बसवण्याची तयारी

0

जामनेर-कोविड 19 आजाराच्या प्राश्वभूमीवर जळगाव जिल्हा अधिकारी यांनी कोरोना संक्रमणाचे वाहक होऊ पाहणारे बोगस डॉक्टर यांचेवर बंदि घालण्याचा आदेश दिलेला आहे आणी कुणी तक्रार केली तर त्यावर योग्य ती कार्यवाई त्या संबंधीत गावच्या आरोग्य अधिकारी यांनी करावी हे क्रमप्राप्त आहे आहे. पाचोरा तालुक्यतील लोहारा या गावी असाच बोगस (बंगाली ) डॉक्टर बऱ्याच दिवसापासून या गावात बस्तान बसवून असून त्याचा हा गोरख धंदा  चांगलाच जोमात सुरु होता  कोरोना च्या या परिस्थिती त जिल्हा अधिकारी यांच्या आदेशा ला हि केराची टोपली हा महाशय दाखवत होता. ते कुणाच्या पाठबळावर तो संशोधनाचा विषय होऊ शकतो पण या वर म्हसास येथील सुयश रवींद्र रोंदळे  यांनी रीतसर तक्रार 28/05/2020 रोजी केल्यावर जिल्हा अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी  जिल्हा परिषद जळगाव यांना पत्र देऊन संबंधितावर कार्यवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या अगोदर 14/05/2020 ला लोहारा ग्रामपंचायतीने स्थानिक डॉक्टर विलास पालीवाल व अन्य सहा डॉक्टरांनी एप्रिल महिन्यात केलेल्या तक्रारी वरून त्या बोगस डॉक्टर वर योग्य ती कार्यवाई करण्याचा ठराव करून तशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र ला कळविण्याचेही नमूद करण्यात आले होते तरीही या बोगस डॉक्टर चा हा धंदा सुरूच आहे तर यावर सुयश रवींद्र रोंदळे यांनी 24/06/2020 ला पुन्हा जिल्हा अधिकारी यांना samran पत्र देऊन कार्यवाई होणेबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नसून कार्यवाई करावी असे म्हटले आहे. या कार्यवाई ची कुण कुण या बोगस डॉक्टर ला लागली असल्याने त्याने आपला मुक्काम आता जामनेर तालुक्यातील रोटवद येथे करण्याचे पक्के केले असून तिथे तो आपले बस्थान बसविण्याच्या तयारीत आहे. या सर्व प्रकरणा कडे आरोग्य विभागाने लक्ष घालून त्याचेवर कार्यवाई व्हावी अशी मागणी लोहारा परिसरातून होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here