मनमाड : आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या प्रयत्नातून शिवसेना मनमाड शहर व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजासाठी आयोजित करण्यात आलेला OBC प्रवर्गातील जातीचे दाखले तयार करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता कार्यक्रम आज, रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता, आमदार सुहास (आण्णा) कांदे जनसंपर्क कार्यालय, मनमाड येथे यशस्वीरीत्या पार पडला.या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील पुरुष, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. दाखले तयार करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची मोठ्या प्रमाणात पूर्तता करून समाजातील अनेकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग खुला झाला.हा उपक्रम आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सक्रिय सहभागातून पार पडला. या उपक्रमामुळे मुस्लिम समाजात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांनी आमदार सुहास(आण्णा) कांदे व संस्थेचे आभार मानले.या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, सहसंपर्कप्रमुख अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, जिल्हा संघटक नाना शिंदे, मा. नगराध्यक्ष योगेश पाटील, सादिक तांबोळी, नगरसेवक कैलास गवळी, अमजद पठाण, अमीन पटेल, युवासेना शहराधिकारी आसिफ शेख, योगेश इमले, जाफर मिर्झा, राजेंद्र जाधव, संजय नागरे, मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे फिरोज शेख, राहील मनसूरी, इमरान शहा, सद्दाम आतार, अमीन तांबोळी, निसार शेख, रहमान मनसूरी, रशीद तांबोळी, सलीम शहा, अजिज शेख, लोकेश साबळे, ताजीम शेख, मनू शेख, फिरोज पठाण, महेंद्र गरुड, बाबा पठाण, सचिन दरगुडे, मयूर गोसावी, पूजाताई छाजेड, निलेश व्यवहारे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








