ग्रामस्थांनी दिले जामनेर तहसिलदार यांना निवेदन
जामनेर /प्रतिनिधी
करमाड गावातील कोरोना समिती ठरतेय कुचकामी तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याने ग्रामस्थांनी दिले जामनेर तहसिलदार यांना निवेदन.
कोरोना संसर्ग संपुर्ण जगात थैमान घालत असून आपल्या जळगाव जिल्ह्यातील लक्षणिय वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने सर्वत्र ठोस पावले उचलले असून नागरिकांना सावध राहण्याची सक्त गरज आहे. सध्यास्थितीत चालू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात शासनाच्या मान्यतेनुसार अनेक नागरिक हे गावाकडे स्थलांतर करित आहे. यामुळे आता खेडेगावांनाही हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका संभवण्याची दाट शक्यता आहे असे नाकारता येत नाही. यामध्ये शासनाने गावातील ज्या प्रशासकीय अधिकारी यांची कोरोना दक्षता समितीमध्ये निवड करून त्यांना गावाच्या सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी दिली आहे. तसेच गावपातळीवर काही निर्णय घेण्याच अधिकार दिले आहे.
तरी महोदय आमच्या करमाड ता.जामनेर या गावात बाहेरून येणार्या सर्वांना होमकोरनटाईन केले जात आहे. यामध्ये कदाचित बाहेरून आलेले व्यक्ती कोरोनाची लागन झाल्याचे उशिरा लक्षात आल्यास त्या व्यक्तीचा संपर्क त्याच्या परिवाराशी वारंवार येत असतो. व त्या परिवारातील सदस्यांचा संपर्क सरळ गावकर्यांशी येतो. काही ठिकाणी त्या व्यक्तींच्या विलगीकरणाचे कोणतेही धोरण अवलंबले जात नसून पारिवारीक समुहपुर्ण रहवाशी येतो. यामुळे कदाचित गावात कोरोना संसर्ग बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच या संसर्गजन्य काळात फळे, भाजीपाला, इलेक्ट्रॉनीक दुरूस्त्या, भंगारवाले व बांगळ्या विक्रेते यासारखे अनेक फेरीवाले अजूनही गावात कोणत्याही वेळेत गावामध्ये येत असून कोरोना दक्षता समितीकडून कोणतीही चौकशी होत नाही आणि सर्व फेरीवाले आजपर्यंत कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या बाबतीत बेशिस्त वर्तनात आढळल्यास गावकरी नेहमीच संबंधीतच्या लक्षात आणून देत असतात परंतु कोणाकडूनही जबाबदारीने त्यांच्यावर कारवाई करणे किंवा समज देणे गरजेचे समजले जात नाही.
वरील विषयी आम्ही ग्रामस्थांनी याबद्दल कोरोना दक्षता समिती अध्यक्ष व सचिव तसेच ग्रामपंचायत करमाड यांना ग्रामस्थांच्यावतीने अर्ज दिला असता त्यावर अनेक ग्रामस्थांच्या सह्या होत्या. सदरील अर्ज ग्रामपंचायतीमध्ये सादर केला असता त्यावर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी कसलेही उत्तर न देता त्यांना नक्कल प्रत मागीतली असता त्याच्यावर आम्हास गच्छि शब्दात तुम्हा ओ.सी. मिळणार नाही. तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या अशी धमकी देत अर्ज देेणार्या व्यक्तीचा अपमान करून परत पाठवले. ही घटना गावातील सामान्य नागरिकांचे मन पिळवून टाकणारी ठरली. या घटनेचा गावकर्यांकडून मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला. परंतु फिजिकल डिस्टींगचे पालन करत आम्ही त्या ठिकाणी गर्दी टाळली परंतु या बेजबाबदार पणाचा व मनमानी कारभाराचा निषेध करून आम्ही आपल्या संबंधितांवर कार्यवाहीची मागणी करून सर्व ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी विनंती अर्ज करीत आहोत. तसेच निवेदन देतेवेळी त्यांच्या सह्या आहेत. ते असे कल्पेश पाटील, सुभद्रा मराठे, सौ. अलका पाटील, सौ. हिना चव्हाण, सौ. संगिता नेटके, सौ. ताई नेटके, निवृत्ती वराडे, भास्कर पाटील, चेतन पाटील, प्रविण पाटील, यशवंत पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रशांत पाटील, ंदीप गायकवाड, अजय शिनगर, दिलीप पाटील, अनिल पाटील, अभिमन शिंदे, भरत पाटील, कैलास पाटील, सचिन राठोड, अमोल पाटील, संदीप पाटील, रविंद्र माळी, देविदास पाटील, गोपाल वाघ, चेतन पाटील,ज्ञानेश्वर शिरसाठ, योगेश वराळे, भुषण पाटील, धिरज पाटील, संजय राठोड, कल्पेश पाटील, जितेंद्र पाटील, सागर साबळे, महारू पाटील, राजेंद्र साबळे, सौरभ साबळे, राजु साबळे, रंगनाथ साबळे, सुनिल पाटील, विनोद साबळे, रितेश पाटील, आनंदा शिंदे, प्रशांत पाटील, रामेश्वर साबळे, सचिन पाटील, सुनिल पाटील, शिवाजी शिंदे, मयुर वखरे, प्रफुल्ल पाटील, चंद्रभागा पाटील, योगेश पाटील, राहुल पाटील, अक्षय पाटील आदी.